सिल्लोड-सोयगाव मार्गांवरील चालत्या बस मधील अडीच लाख रुपयांचा दरोडा, पाच महिलांना बेड्या. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१

सिल्लोड-सोयगाव मार्गांवरील चालत्या बस मधील अडीच लाख रुपयांचा दरोडा, पाच महिलांना बेड्या.

औरंगाबाद - सिल्लोड हुन सोयगाव कडे जाणाऱ्या बस मध्ये पाच महिलांनी मिळून औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा असलेल्या शिवना मध्यवर्ती बँकेच्या मॅनेजर कदम यांच्या बॅग मधून अडीच लाख रुपये काढून घेतले मात्र वाहक आणि चालक यांच्या सतर्कतेमुळे या पाचही महिला पकडल्या गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर कदम हे सोयगावला जाण्यासाठी बस मध्ये बसले असता सिल्लोड येथूनच कदम यांच्यावर पाळत ठेवत त्यांचा पाठलाग करत बस मध्ये बसल्या. पाच महिलांपैकी 2 महिला मॅनेजर कदम यांच्या बाजूला सीटवर बसल्या, बसचे वाहक यांना महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले होते. महिलांनी अजिंठ्याचे तिकिट काढले होते मात्र गोळेगाव येथे उतरल्याने त्यांना संशय अधिक पक्का झाला त्यांनी लगेच मॅनेजर कदम यांना विचारले असता कदम हे भांबावून गेले आणि बॅगमध्ये बघितले तर पाच लाखा पैकी अडीच लाख चोरी झाले होते, त्यांनी लगेच आरडाओरड केली त्यावेळी गोळेगाव येथील उंडणगाव चौफुलीवर अजिंठा पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल रविकिरण भारती व साबळे हे बंदोबस्तासाठी हजर होते त्यांनी सदरील महिलांचा पाठलाग केला यावेळी गावचे सरपंच गणेश पाटील बनकर उपसरपंच अनिल बनकर व शंकर जाधव यांच्या मदतीने या महिला पळत असताना पकडल्या व त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची रोकड मिळून आली, तसेंच सिल्लोड येथे मागील महिन्यामध्ये याच महिलांनी सोन्याची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे यामुळे या मागे मोठी टोळी असल्याचा संशय होत आहे. बीट जमादार राकेश आव्हाड यांनी सदरील महिलांना अटक करून 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश आव्हाड हे करीत आहे.