याप्रसंगी ही कार्यकारिणी मा.नरेंद्र सोनारकर विदर्भ अध्यक्ष, मा.निलेश ठाकरे पुर्व विदर्भ संघटक, मा.रूपेश निमसरकार जिल्हाध्यक्ष चंद्रपुर, जिवणदास गेडाम जिल्हा महासचिव चंद्रपुर, यांच्या उपस्थित घेण्यात आली व नवनियुक्ती झालेल्यांचे अभिनंदन करण्यात आले.
२९ ऑगस्ट २०२१
पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीची कार्यकारिणी गठीत
(शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी ) महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा कायम आहे. या राज्यातील पुरोगामी विचारांची क्रांती भुमी आहे.या क्रांती भुमीत पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा भर विस्तारीत असताना भद्रावती तालुक्यात संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
सविस्तर वृत्त, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या भद्रावती तालुका शाखेची कार्यकारिणी दि. २९ आगस्ट २०२१ ला मान्यवरांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली आहे.
सदर पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तालुका शाखा भद्रावती च्या नवीन कार्यकारणीत तालुका अध्यक्ष पदावर प्रवीण चिमुरकर, कार्याध्यक्ष मनोज मोडक, उपाध्यक्ष शिरीष उगे, सचिव तथा प्रसिद्धी प्रमुख उमेश कांबळे, सहसचिव ज्ञानेश हटवार, संपर्क प्रमुख किशोर ठेमस्कार , सदस्य सदानंद आगबत्तनवार ह्या सर्वाना नियुक्त पत्र देऊन भद्रावती तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
