नागापुर येथील शाळेचे वर्गमित्र ३१ वर्षानंतर पुन्हा एकत्र, गौताळा अभायरण्य येथे गेट टु गेदर कार्यक्रम संपन्न. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑगस्ट १८, २०२१

नागापुर येथील शाळेचे वर्गमित्र ३१ वर्षानंतर पुन्हा एकत्र, गौताळा अभायरण्य येथे गेट टु गेदर कार्यक्रम संपन्न.

औरंगाबाद - सुरुवातीला जे वर्गमित्र,संस्थेचे संचालक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी निधन पावले, तसेच सीमेवरील शहीद जवान, कोरोना काळातील निधन पावलेले या सर्वांना  सर्वप्रथम दोन मिनीटे स्तब्धता राखून श्रद्धांजली वाहण्यात आली .
    सर्व कन्नड तालुक्यातील नागापुर येथील नागेश्वर विद्यालयातील १९९० चे वर्गमित्र तब्बल 31 वर्षांनंतर गौताळा अभयारण्यात एकत्र आले . या सर्वांना एवढ्या दिवसानंतर एकत्र भेटून पुन्हा एकदा वर्ग भरल्याचा आनंद झाला . 
    या गेट-टुगेदर चे वैशिष्ट्य म्हणजे सर्वजण सहकुटुंब आले होते . त्यातील अर्धेअधिक वर्गमित्र तर चक्क आजोबा झाले होते . त्यातील बरेचजण प्रथमच ३१वर्षानंतर एकमेकांना भेटत होते .भीमराव सोनवणे यांनी सांगितले माझे लग्न झाले, मुले झाले, त्यावेळी जेवढा आनंद झाला, त्याच्या पेक्षा हि जास्त आनंद आज मला झाला आहे .दाळबट्टीचे जेवण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .
गेट टु गेदर कार्यक्रम प्रसंगी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतांना सर्व माजी वर्गमित्र.

यांची होती उपस्थिती.