फर्दापुर येथील सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची ना.अब्दुल सत्तार यांच्याकढुन पाहणी. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१७ ऑगस्ट २०२१

फर्दापुर येथील सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची ना.अब्दुल सत्तार यांच्याकढुन पाहणी.

औरंगाबाद - राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी सोयगांव तालुक्यातील फर्दापुर येथील सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. पाणी पुरवठा योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा असे निर्देश याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी जि. प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, उस्मानखा पठाण,सरपंच श्रीमती शकीलाबी शेख हुसेन, उपसरपंच हिरा चव्हाण, तहसिलदार रमेश जसवंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता एल.बी. एकबोटे, शाखा अभियंता बाबासाहेब सदावर्ते, तांत्रिक साहायक रमेश दामोधर आदिंची उपस्थिती होती.
कामाची पाहणी करतांना ना.अब्दुल सत्तार.