नवल: रंग बदलणारे शिवलिंग
राजस्थानमधील धौलपूरमध्ये चंबळ नदीजवळ व माऊंट अबूपासून सुमारे अकरा किलोमीटरवर अचलगढ पर्वतावर अचलेश्वर महादेव मंदिर आहे.ते २५०० वर्ष जुने आहे.
अचलगढ पर्वत म्हणजेच अचलगढ किल्ला होय.परमार राजवंशातील राजांनी हा किल्ला बांधला होता या राजवंशातील महाराणा कुंभा यांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता.या मंदिराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंगाचा दिवसातुन तीनवेळा रंग बदलतो. हे शिवलिंग सकाळी लालसर दिसते तर दुपारी केशरी रंगाचे दिसते. रात्रीच्या वेळी हे शिवलिंग काळसर रंगाचे दिसते.असे का घडते हे गूढ आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला समजले नाही. मंदिरात विविध शोध टीमने येउन शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या चमत्कारी शिवलिंगाचे रहस्य उघड झालेले नाही.
पुराणात असा उल्लेख आहे की,अचलगढ पर्वत डगमगत असताना शिवशंकरांनी तो आपल्या अंगठ्याने स्थिर केला होता.त्या अंगठ्याचा ठसा आजही दाखवला जातो.या ठस्याची दररोज पुजा केली जाते. तिथेच आता एक कुंडही आहे.या कुंडातील पाणी भाविक प्राशन करतात.याशिवाय पंचधातूपासुन बनवलेला नंदी असुन या नंदिने मंदिराला मुस्लिम आक्रमणापासून वाचविले अशी आख्यायिका सांगितली जाते.ज्यावेळी मुघलानी मंदिरावर हल्ला केला होता त्यावेळी त्यांच्यावर मधमाशानी हल्ला करून आक्रमण परतवुन लावले होते व हे नंदिने घडवुन आणल्याची मान्यता आहे.
या मंदिरात भाविकांची कायम गर्दी असते.