महाराष्ट्र राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा काही जिल्ह्यांना अलर्ट जारी. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१

महाराष्ट्र राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा काही जिल्ह्यांना अलर्ट जारी.

नवी मुंबई - भारतीय हवामान विभागाच्या मुंबई व नागपूर येथील कार्यालयांद्वारे जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्या नुसार महाराष्ट्र राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. यामध्ये पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड,परभणी, बीड, हिंगोली, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलाय.वरील सर्व जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.