एअर इंडियामध्ये भरती, पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१७ ऑगस्ट २०२१

एअर इंडियामध्ये भरती, पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी.●एयर इंडियाची सहयोगी कंपनी एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AISEL) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – फायनान्स आणि असिस्टंट सुपरवायजर-अकाउंट्सच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

●अर्ज कसा करणार.
अर्ज करण्यास इच्छुक व योग्य उमेदवाराने एअर इंडियाची ऑफिशियल वेबसाइट, airindia.in  वर करियर सेक्शनमध्ये उपलब्ध केलेला अ‍ॅप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरून आणि विचारलेली कागदपत्रे जोडून २८ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुढील पत्त्यावर जमा करायचे आहे. 

● पत्ता :- एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AISEL), पर्सोनेल डिपार्टमेंट, सेकंड फ्लोर, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एयरपोर्ट कॉम्पलेक्स, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली- ११०००३. अर्जासह १,५०० रुपयांचा डिमांड ड्राफ्टही जोडायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड च्या नावे नवी दिल्ली येथे देय असायला हवा.

●पात्रता :- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह - फायनान्स - उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) ची इंटर परीक्षा किंवा फायनान्समध्ये पूर्णवेळ एमबीए डिग्री प्राप्त केलेली असणे अनिवार्य. सोबतच संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षे असावी. 

●असिस्टंट सुपरवायझर - अकाउंट्स - उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा अन्य संस्थेतून कॉमर्स शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी आणि संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव असावा. वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२१ रोजी २८ वर्षे असावी.