म्हणुन उंटाला विषारी जिंवत साप खाऊ घालतात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० ऑगस्ट २०२१

म्हणुन उंटाला विषारी जिंवत साप खाऊ घालतात

  म्हणुन उंटाला विषारी जिंवत साप खाऊ घालतात 


उंट वाळवंटी प्रदेशात राहणारा प्राणी आहे. वाळवंटातील वास्तव्यासाठी त्याची नैसर्गिक जडणघडण झाली आहे.उंटांच्या मुख्यत्वे दोन जाती आहेत. एक वाशींडी व दोन वाशींडी.

एक वांशिंडी उंट राजस्थान,गुजरात व अरब देशात पाळला जातो तर दोन वांशिंडी उंट हा बर्फाळ प्रदेशात आढळतो.चीनच्या सीमेवर गस्त घालण्यासाठी आपले भारतीय सैनिक दोन वांशिंडी उंटाचा उपयोग करतात 

पूर्ण वाढ झालेल्या ऊंटाची उंची साधारणपणे वाशींडांना धरून सात फूटांपेक्षा जास्त असते. उंटाचा वेगाने धावण्याचा वेग पासष्ट कि.मी. प्रति तास असतो. उंट अन्न चरबीच्या रुपात वाशींडां मध्ये साठवून ठेवतो आणि अन्नाची कमतरता आल्यावर त्यातून गरज भागवतो.

सुदान मध्ये उंटांची शेती ही केली जाते. लष्करात उंटांचा वापर करून घेतला जातो.उंटांचे दूध पिण्यासाठी वापरले जाते.

उंटाचा प्रमुख उपयोग वाळवंटातील वाहन म्हणून केला जातो. त्याची पाणी न पिता तसेच चरबी साठवणूक करण्याची क्षमता यामुळे तो वाळवंटी प्रदेशातील आदर्श वाहन बनतो.. अनेक समाज दूध व मांसासाठी, आणि लग्न व संपत्तीसाठीदेखील उंटांवर अवलंबून असतात.

गरम हवेत धापा टाकत प्रवास केल्यामुळे उंटांना श्वसनाचे रोग जडतात. त्यांच्या मदारीमध्ये मेद जास्त असतो. त्यात अधिक आर्द्रता तयार होते, तसेच सतत खोगीर वागविल्यामुळे बेडसोर्ससारखे घट्टे पडतात.त्यांच्या नाकात वेसणीसाठी लाकडी खुंटा टाकला जातो. त्यातूनही त्यांना जखमा होतात.

म्हणुन उंटाला विषारी जिंवत साप खाऊ घालतात

वाळवंटात काटेदार कॅक्टस तर उंट सहज खातो.(जशी आपणाकडे शेळी बाभळकाटे खाते.)टोकदार काटयामुळे यांच्या तोंडातील जीभेला,गालाला काही होत नाही हे विशेष.उंटाला एक अज्ञात रोग होतो त्यामुळे त्यांचा तोंडात व पायात  वेदना राहते.यामुळे उंट आजारी पडतो.ज्यामध्ये उंट खाणे बंद करतो.  मृत्यूपर्यंत उंट फक्त सूर्याकडे टक लावून पाहतो.  असे म्हणतात की, यावेळी उंटाला विषारी जिंवत साप खाऊ घातल्यास उंट बरा होतो.

म्हणुन उंटाला विषारी जिंवत साप खाऊ घालतात

उंटाला साप खाऊ घालण्यासाठी चार माणसे लागतात.शेपटी पकडली की उंट पळून जाऊ शकत नाही. "दुसऱ्या व्यक्तीने उंटाच्या कानापाशी जायचं. मग त्याचे दोन्ही ओठ धरायचे," तिसरयाने त्याच्या तोंडात हात घालून त्याचे तोंड वासायचे तर चौथ्याने त्याच्या तोंडात साप सोडून वरून लगेच पाणी आोतायचे. साप गिळल्यानंतर उंटाची तहान वाढते आणि ६ तास या अवस्थेत राहिल्यानंतर सापाच्या विषामुळे उंटाच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत असते. असे केल्याने काही वेळातच उंट खडखडीत बरा होतो.

पण हा प्रकार पशु वैद्यकाना मान्य नाही.तसे पाहता,उंटाना साप खाऊ नाही घातला तरी तो स्व:त चरत असताना साप खाल्याची उदाहरणे आहेत.

हरिण सुध्दा चरत असताना साप खाते असे दाखले आहेत.प्राण्याना ही उपजत बुद्धी असते असे म्हणतात.

(वाघ सुध्दा अपचन झाल्यास गवत खातो किंवा तत्सम वनस्पती खातो) 

एवढेच काय आपल्या कडील पाळीव मांजर सुध्दा विशिष्ट प्रसंगी गवत खाते.