पुणे जिल्ह्यातील बेलसर ग्रामपंचायतीने वाटले नागरिकांना मोफत कंडोम. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ ऑगस्ट २०२१

पुणे जिल्ह्यातील बेलसर ग्रामपंचायतीने वाटले नागरिकांना मोफत कंडोम.

पुणे - महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यातच आता दुसऱ्या आजाराने डोकं वर काढलं आहे. झिका विषाणूने राज्याची चिंता वाढवली आहे. पुणे जिल्ह्यातील बेलसर गांवामध्ये कार्यालय ग्रामपंचायतीकडून चक्क कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. पुढचे काही महिने गावात महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे असा सल्ला तज्ञ डॉक्टरांकडून गावकऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना कंडोमचे वाटप करण्यातआले आहे.