मोटरसायकल चोरटे मोटरसायकलसह पोलिसांच्या ताब्यात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१७ ऑगस्ट २०२१

मोटरसायकल चोरटे मोटरसायकलसह पोलिसांच्या ताब्यातशिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी 
: शहरातील पांडव वार्ड येथील मोटर सायकल चोरी गेल्याची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली त्याआधारे पोलिसांनी मोटरसायकल सह दोन आरोपींना अटक केली ही कारवाई रविवार ला करण्यात आली . यातील आशिष नागोजी बुचे वय 23 . साजन जनार्दन वानखेडे वय 18 दोन्ही राहणार शिवाजीनगर असे आरोपीचे नाव आहे पांडव वाडा येथील छत्रपती बबनराव देवतळे यांची मोटारसायकल क्रमांक 34 टी 30 23 किंमत पंचवीस हजार घरात तून चोरी गेल्याची तक्रार पोलिसात दिली होती त्यांनी या आरोपीचा छडा लावून मोटर सायकल दोन आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार हेमराज प्रधान, केशव चीटगिरे यांनी केली गेल्या काही दिवसापासून भद्रावती पोलिसांनी चोरट्यांवर विशेष मोहीम राबवून धाडसत्र चालू केले आहे .