राज्यस्तरीय खुल्या कविता लेखन स्पर्धेत सुरज दहागावकर द्वितीय... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ ऑगस्ट २०२१

राज्यस्तरीय खुल्या कविता लेखन स्पर्धेत सुरज दहागावकर द्वितीय...

राज्यस्तरीय खुल्या कविता लेखन स्पर्धेत सुरज दहागावकर द्वितीयगोंडपिपरी: श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचलित मा. विलासजी होडे स्मृती वाचनालय, आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांच्यातर्फे विलासजी होडे यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय निबंध व कविता स्पर्धा- २०२१ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून यातील कविता लेखन स्पर्धेत गोंडपिपरी तालुक्यातील सुरज दहागावकर यांनी सुयश मिळविले आहे.           
       
       ओबीसी जनगणना या विषयांवर ही कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात होती. यात सुरजने लिहलेल्या "ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे" या कवितेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. कविता लेखन स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल सुरजचे सर्वत्र कौतुक होत असून त्याने यशाचे श्रेय आई-बाबा, गुरुजन आणि मार्गदर्शकांना दिले आहे.

             सुरज हा मूळचा गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर(चेकबापूर) या गावातील असून तो सध्या नागपूर येथील तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात समाजकार्याचे शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रातील विविध मासिक- वृत्तपत्रामध्ये सुरजच्या लेख आणि कविता नेहमी प्रकाशित होत असतात आणि तो नेहमी सामाजिक विषयांवर लिखाण करत असतो हे त्याच्या लिखाणाचे वेगळे वैशिष्ठ आहे... 

           या राज्यस्तरीय निबंध व कविता स्पर्धेला राज्यभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी मा. विलासजी होडे स्मृती वाचनालयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आरवली जि. रत्नागिरी येथे होईल असे आयोजकांनी कळविले आहे.