लॉकडाऊनमुळे अडचणीत आल्याने मंडप व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० ऑगस्ट २०२१

लॉकडाऊनमुळे अडचणीत आल्याने मंडप व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या.

औरंगाबाद - संपूर्ण देशात कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले होते. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने नैराश्यात जात औरंगाबाद शहरातील ३४ वर्षीय तरुण मांडव व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पाडेगाव भागातील सैनिक कॉलनीत घडली असून भाऊलाल हिरालाल वाणी (३४) रा. माजी सैनिक कॉलनी असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.