राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चोपडा शहराध्यक्षपदी श्याम सिंग परदेशी यांची निवड. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑगस्ट १८, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चोपडा शहराध्यक्षपदी श्याम सिंग परदेशी यांची निवड.

जळगांव - चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गो.भि. जिनिंग येथे 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम अति उत्साहात पार पडला.या क्षणी रिक्त असलेल्य शहराध्यक्षपदी श्यामसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. व तसे नियुक्तीपत्र माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी चोसाकाचे माजी चेअरमन घनश्याम पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरख तात्या पाटील,माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी,व्हाईस चेअरमन प्रवीण गुजराथी, अजगर अली दादा, नगराध्यक्ष मनीषा चौधरी ,उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, बांधकाम सभापती रमेश शिंदे ,नगरसेवक हितेंद्र देशमुख, हुसेन पठाण, एहसानअली सय्यद,अकील जहागीरदार, दिपाली चौधरी, वसंत सोनार कैलास सोनवणे,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील,चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, संचालक सुनील महाजन आनंदराव रायसिंग ,शेखर पाटील निलेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर देशमुख ,नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्य नीलम पाटील, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट शेखर पाटील, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अक्रम तेली ,जिल्हाध्यक्ष नौमन काजी,तालुका कार्याध्यक्ष नईम शेख,जमील कुरेशी, मोसिन शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विभागाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.