२८ ऑगस्ट २०२१
नागपूर /अरुण कराळे (खबरबात)
बाहेरगावी परिवारासह गेलेल्या बंद घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करणारा तसेच इतर चोरीच्या गुन्ह्याची कबुली देणारा आरोपी आकाश सुखराम सहारे वय ३४ रा. म्हाडा कॉलनी ,आठवा मैल ताजने ले -आउट यास वाडी पोलिसांनी मुद्देमालसह अटक केली आहे. प्राप्त पोलीस माहितीच्या सुत्रानुसार फिर्यादी बद्रीप्रसाद विजरबहादूर गुप्ता वय ६१ रा. घर क्रमांक ७७ , ए भारत नगर सोसायटी ,वडधामना हे दिनांक १४ जुन २०२१ते १० जुलै २०२१ च्या दरम्यान घराला कुलूप लावून परिवारासह बाहेर गावी गेले असता आरोपी आकाश सहारे याने घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घराचे आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी २० हजार रुपये असा एकूण एक लाख ५१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून वाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात दुय्यम पोलीस निरीक्षक भारत कऱ्हाडे,उपनिरीक्षक साजिद अहेमद, पोलीस कॉन्सटेबल सुनील मस्के,राजेश धाकडे, अमलदार प्रदीप,प्रमोद,सतीश,हेमराज,ईश्वर यांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.तसेच तपासा दरम्यान आरोपीने खडगाव रोड ,वाडी येथील पवन सुरेश आचार्य याचेही घरी चोरी करून सोने-चांदी व मोबाईल असा एकूण ५८ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांनी दिली.आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यातील एकूण एक लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात कलम ४५७, ४५४, ३८० भादवी नुसार गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक साजिद अहेमद पुढील तपास करीत आहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
