विदर्भ राज्य आंदोलन समितीचा रास्ता रोको आंदोलनाने, वेगळ्या विदर्भ राज्यासाठी एल्गार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ ऑगस्ट २०२१

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा रास्ता रोको आंदोलनाने, वेगळ्या विदर्भ राज्यासाठी एल्गार(शिरीष उगे भद्रावती प्रतिनिधी)
            :  विदर्भावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीचा
रास्ता रोको आंदोलनाने, वेगळ्या विदर्भ राज्यासाठी एल्गारप्रतिकारार्थ आणि स्वतंत्र विदर्भ राज्य या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दि.२६ ऑगस्टला दुपारी १२ वाजता चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील पेट्रोल पंप चौकात " रास्ता रोको " आंदोलन केले. ज्यामुळे काही काळ वाहतूकीचा खोळंबा झाला. दरम्यान पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली.यावेळी विदर्भवाद्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
          या आंदोलनात प्रा.विवेक सरपटवार, सुधिर सातपुते,राजू बोरकर,सुभानभाई सौदागर,प्रकाश आस्वले ,सुरेश आस्वले, वामन मत्ते,बबन दानव,बाबाराव बिबटे,नारायण जगताप,विशाल बोरकर,मनोहर आस्वले, राहुल चौधरी, वशिष्ठ बेडकर, ग्रिब्दस बुरचुंडे, कॉ. राजू गैनवार, देवराव नागपुरे यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आंदोलन शांततेत पार पडले.