आठवा मैल गणेशनगर परिसरातून दहा जुगाऱ्यांना अटक, एक फरार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑगस्ट २५, २०२१

आठवा मैल गणेशनगर परिसरातून दहा जुगाऱ्यांना अटक, एक फरार

आठवा मैल गणेशनगर परिसरातून दहा जुगाऱ्यांना अटक, एक फरार
३ लाख ३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
पोलीस स्टेशन वाडी हद्दीतील दवलामेटी ग्रामपंचायत अंतर्गत आठवा मैल गणेशनगर म्हाडा कॉलनी येथे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी वाडी पोलिसांनी धाड टाकुन १० आरोपींना घटनास्थळावरून मुद्देमालासह अटक तर एक आरोपी फरार झाल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी दिली. प्राप्त पोलीस माहितीच्या सुत्रानुसार आरोपी रवि गुरूदयाल बत्रा ,वय १४ वर्ष रा. प्लॉट नं १०४ वेलकम सोसायटी ,काटोल रोड नागपूर ,शिव अरूण झनझोटे वय ३३ वर्ष रा. ५१२ / १८ सुरेन्द्रगढ़ सेमेनरी हिल्स नागपूर, मोहन ज्ञानेश्वर खरजे वय २७ वर्ष रा. प्लॉट नं २५ शिवाजी नगर वडधामना ,निलेश प्रकाश धानके वय ३० वर्ष रा. टी व्ही टॉवर चौक सीपी डब्लू कॉलनी नागपूर,अभिषेक उर्फ बादल किशोर शिंगारे वय २१ वर्ष रा.प्लॉट नंबर ३ सुखसागर सोसायटी दाभा,नागपूर , विलास वनवासे तोडासे, वय ३८ वर्ष जगदिश नगर पंडित नेहरू चौक जवळ काटोल रोड, नागपूर,राज धनराज शेंडे वय ४४ वर्ष रा. प्लॉट नंबर ११२ आठवा मैल ,दवलामेटी ,वैभव उत्तम ठाकरे वय २४ वर्ष रा. आयबीएम रोड गिट्टीखदान आखरी बस स्टॉप जवळ नागपूर,सनि विजय मेश्राम वय २८ वर्ष रा . प्लॉट नंबर ७८ विकास नगर वाडी, हिरासिंग शंकरसिंग परिहार वय ३५ वर्ष रा. मकडधोकडा काटोल रोड नागपूर तसेच पळून गेलेल्या आरोपीचे नाव सतिश उइके वय ३६ वर्ष रा. मकरधोकडा नागपूर असे आहे. आरोपीनी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशनगर झोपडपट्टी म्हाडा कॉलनी क्वार्टर परीसरातील मोकळ्या जागेत एका झाडाखाली लाईटच्या उजेडात पैशाची बाजी लावून जुगार खेळत असताना ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश मुंढे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी धाड टाकली असता दहा आरोपींना अटक केली तर एक आरोपी फरार झाला.घटनास्थळावरून आरोपी कडून ५२ ताश पत्ते,नगदी १२,३६० रुपये काळया रंगाची पल्सर गाडी क्रमांक एमएच - ३१ एफ एच ०४६८ अंदाजे किंमत ५०,००० रुपये,होंडा शाईन गाडी क्रमांक एमएच -४० एव्ही ८११७ अंदाजे किंमत २५,००० रुपये ग्रे रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एमएच - ३१ सीके २७६६ अंदाजे किंमत ३०,००० रुपये,पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एमएच - ४० ए डब्लू ८५२१ अंदाजे किंमत ४०००० रुपये , पांढऱ्या या रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एमएच -३१ इ एक्स ७१०८ किंमत ३५००० रुपये ,लाल रंगाची फॅशन प्रो गाडी क्रमांक एमएच - ४० एम २५३२ किंमत ३०००० रुपये , सिल्व्हर स्पेलंडर आयस्मार्ट गाडी क्रमांक एमएच - ३१ इटी -४७०२ किंमत ३०,००० रुपये तसेच विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण ३ लाख ,३ हजार ३६० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द महाजुगार कायदा कलम १२ ( अ ) मुंबई जुगार प्रतिबंध नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.