रेणापूर तालुक्यातील कामखेडा ग्रामपंचायत गैरव्यवहाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२३ ऑगस्ट २०२१

रेणापूर तालुक्यातील कामखेडा ग्रामपंचायत गैरव्यवहाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.


 
लातूर - रेणापूर तालुक्यातील कामखेडा ग्रामपंचायतीतील गैर कारभाराबद्धल गावातील नागरिकांतून 13,14,15 व्या वित्त आयोग निधीतून केलेल्या कामाची चौकशी करावी अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन  गावकर्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे. 
मनरेगा ,दलित वस्तीतील काम इतर ठिकाणी केल्याबद्दल, नाली सफाई न करताच रक्कम उचलून घेऊन खर्च करण्यात आले, नविन नळ योजनेच्या नावाखाली भरमसाठ अनामत रक्कम पाणी पट्टी गोळा करणे ,गावातून जाणार्या वाहतूकदाराकडून अवैध रक्कम गोळा करणे ,ग्रामपंचायतीचे बॅंक खात्यात रक्कमेची चौकशी,ग्रामपंचायतीचे ऑडीट,तसंच फक्त मर्जीतील व्यक्तीनांच शासनाच्या विविध लाभ व विहीरी देणे अशा अनेक संशयास्पद कारभाराबद्धल नागरिकांतून संशय बळावल्याने धरणे अंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भुजंगराव पाटील, गोविंद सुर्यवंशी,राजेसाहेब सूर्यवंशी, अंगद पाटील, गोपाळराव सोमवंशी,योगेश सातपुते,सिद्राम जोगदंड, भीमराव औसेकर, नागनाथ धावने,नागनाथ कसमळे,लहु सोमवंशी सह शंभर जनांच्या सह्या आहेत.