आता येणार "बटाटयाचे दुध" - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ ऑगस्ट २०२१

आता येणार "बटाटयाचे दुध"

 आता येणार "बटाटयाचे दुध"


ѾѾѾѾѾѾѾѾ҆Ѿ҆҆҆ѾѾѾѾѾ҆҆҆


दूध हे आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पूर्वीच्या काळापासून दुधाला महत्त्व दिले जाते. दूध व दुधाचे पदार्थ हे सर्व पूजा-अर्चाना, नैवेद्य यात वापरले जातात. आहारशास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थाना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात. याचे कारण असे की, नवजात शिशू आपल्या आयुष्याचे पहिले सहा महिने फक्त दुधावरच अवलंबून असतो. दूध व दुधाचे पदार्थ शाकाहारी अन्नातील मुख्य घटक आहेत. दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. यातील प्रथिने डाळी, कडधान्ये यांच्यातील प्रथिनांपेक्षा उच्च दर्जाची असतात. शाकाहारी अन्नात प्रथिनांचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे दूध व त्याचे पदार्थ ही उणीव भरून काढतात.हे झाले आपले पारंपरिक म्हणजे प्राण्यापासून मिळवलेले दुध.हल्लीच्या युगात “दुग्धजन्य पदार्थांना पर्यायांची मागणी म्हणून आोट मिल्क,कॅश्यु मिल्क,आल्मन्ड मिल्क हे प्रकार आले आहेत.

आता येणार "बटाटयाचे दुध"

हे दुधं पण चांगली आहेत. हे कमी म्हणुन की काय,आता बटाटयाचे दुध येऊ घातले आहे.स्वीडिश कंपनी व्हेज ऑफ लंडने ब्रँड डीयूजीने सर्वात आधी बटाट्याचं दूध हा पर्याय उपल्बध करून दिला आहे.बटाट्यापासून बनवलं जाणारं हे पेय ‘अतिशय टिकाऊ’ आहे. तसेच इतर दुधापेक्षा बटाट्याचं  दूध तयार करण्यासाठी खूप कमी संसाधने लागतात.

बटाटयापासुन दुध तयार २०१५ मध्ये कॅनडा आणि अमेरिकेतील एका वेगन ब्रँडने सुरू केली होता.

असे तयार करतात बटाटयापासुन दुध

“बटाट्याचं दूध बनवण्यासाठी बटाटे गरम करून आणि पाण्यात उकळून आणि त्यानंतर रेपसीड तेल आणि कॅल्शियमसाठी इतर पदार्थ, मटार प्रथिने आणि चिकोरी फायबर घालून एक स्मूथ (फेसाळ) मिश्रण बनवलं जातं. त्यानंतर ते विविध जीवनसत्त्वे म्हणजे व्हिटॅमिन डी आणि बी १२ ने परिपूर्ण बनते. व्हिटॅमिन ए, सी, डी, ई आणि के तसेच व्हिटॅमिन बी यांसह कॅल्शियम आणि लोह यासह इतर महत्वाची जीवनसत्त्व आणि खनिजांनी परिपूर्ण आहे.

पारंपारिक दुधाला हा पर्याय जरी असला तरी मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि अपचनाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे दूध एक चांगला पर्याय ठरेल किंवा नाही याबाबत कोणताही पुरावे उपलब्ध नाहीत.यामुळे या दुधाबद्दल साशंकता निर्माण होते.