कंपनीतील लोखंडी रॉडची चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ ऑगस्ट २०२१

कंपनीतील लोखंडी रॉडची चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात


कंपनीतील लोखंडी रॉडची चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दोन आरोपींना मुद्देमालासह अटक
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
कंपनीत ठेवलेला लोखंडी रॉड अज्ञात आरोपीनी चोरून नेल्याची तक्रार सुपरवायझरनी केली असता पोलिसांनी आरोपी विशाल विश्वनाथ रोकडे वय २७ वर्ष रा. इंदिरा झोपडपट्टी नागलवाडी तसेच बबलू खुशाल उमक वय २५ वर्ष रा. इंदिरा नगर झोपडपट्टी नागलवाडी यांना अटक केली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस स्टेशन वाडी हद्दीतील नागलवाडी येथील एफकॉस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नागपूर मेट्रो प्रोजेक्ट येथे फिर्यादी सचिन शामराव मुन वय ३५ वर्ष रा. वडधामना जुनी वस्ती लोटस कॉन्व्हेंट जवळ वानाडोंगरी रोड हे या कंपनीत सुपरवायझर पदावर कार्यरत असून कंपनीत ठेवलेला लोखंडी माल ठेवलेल्या ठिकाणी व्यवस्थित याची दि. ३१ जुलै रोजी रात्री १० वाजता तपासणी केली असता ठेवलेला माल व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आले परंतु दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान लोखंडी रोडची मोजणी केली असता १०५ लोखंडी मॅकलाय बार कमी आढळून आले.प्रत्येकी १४ किलोग्रॅम प्रमाणे एकूण ५६० किलोग्रॅम नुसार ५८ हजार ८०० रुपये किमतीचा माल कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस स्टेशनला लेखी तक्रार करताच वाडी पोलिसांनी ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून वाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी,दुय्यम पोलीस निरीक्षक भारत कऱ्हाडे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक साजिद अहमद , पोलीस कॉन्सटेबल सुनील मस्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास केला असता आरोपी विशाल रोकडे व बबलू उमक याना संशयास्पद रित्या आढळून आल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असता मुद्धेमालसह पोलिसांनी त्यांना अटक केली.