श्री क्षेत्र विटनेर येथे २२ ऑगस्ट रोजी संत तानाजी महाराज यांचा ८३ व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ ऑगस्ट २०२१

श्री क्षेत्र विटनेर येथे २२ ऑगस्ट रोजी संत तानाजी महाराज यांचा ८३ व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगांव - श्री क्षेत्र विटनेर येथील प्राचीन परंपरा असणारा श्री संत तानाजी महाराज यांचा ८३ वा समाधी सोहळा २२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे कोरोनाच्या प्रवाभामुळे अत्यंत साध्या आणि मोजक्या लोकांमध्ये हा सोहळा साजरा होणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ८ ते १० देवता स्थापना व भजनाचा कार्यक्रम,१०.३० नंतर महाप्रसाद तसेच रात्री ८ ते १० हभप गुलाबराव जी महाराज लोणकर यांचे हरिकीर्तन राहील याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन संत तानाजी महाराज यांचे वंशज महंत प्रा.हभप सुशिल महाराज विटनेरकर यांनी केले आहे.