श्री संत नामदेव महाराज यांचा ६७१ वा संजीवनी समाधी सोहळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ ऑगस्ट २०२१

श्री संत नामदेव महाराज यांचा ६७१ वा संजीवनी समाधी सोहळाशिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
: श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७१ वा संजीवनी समाधी सोहळा श्रीरामनगर येथील माही सभागृहात कोरोना काळामुळे अगदी साधेपणाने पार पडला.
जेष्ठ शिंपी समाज नेते काशीनाथ मनगटे गुरुजी यांचे हस्ते श्री संत नामदेव महाराउ8उज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित आणि माल्यार्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. नामदेव महाराजांनी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढ वद्य १३ शके १२७२ शनिवार दि. ३ जुलै १३५० रोजी याच दिवशी समाधी घेतली. या पुण्य पर्वाला दि.६ ऑगस्ट ला ६७१ वर्षे पूर्ण झाले आहेत. कोरोना काळ लक्षात घेता हा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी नामदेव महाराज यांच्या जीवनावर आधारित आपापली मनोगते व्यक्त करून प्रकाश टाकला.
     यावेळी शिंपी समाजाचे दिलीप ठेंगे, दिलीप बेलगे, अनंता ठेंगे, महेंद्र मनगटे, राहुल ढाले, किरण देवगिकर, मंगेश ढपकस, प्रमोद ढगे, अनिल टिकले, प्रदीप ठेंगे, विजय ठेंगे, श्रीधर किटे, अर्चना ढगे, कांचन ठेंगे, भाग्यश्री दांडेकर, माधुरी ढगे, सीमा ठेंगे, कीर्ती मनगटे, शिल्प देवगिरकर, वर्षा ठेंगे, कु. निधी ठेंगे, कल्पना टिकले, सुनीता ढाले, पूजा ढाले, नैना टिकले, शीतल ढाले यांचेसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.