आणि मंत्र्यानी मारला वाहनचालकास सॅल्यूट! बातमी वाचाल तर समजेल नेमके कारण.. ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ ऑगस्ट २०२१

आणि मंत्र्यानी मारला वाहनचालकास सॅल्यूट! बातमी वाचाल तर समजेल नेमके कारण.. !
मारोतीभाऊ किन्हाके, माझ्या शासकीय पोलिस ताफ्यातील वाहन चालक! आज ते शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. मंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकले ते मारोतीभाऊ यांच्यासारख्या सहकाऱ्यांमुळे. आज त्यांचं औक्षण करून शाल व श्रीफळ देत त्यांचा सत्कार केला. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर 
 Yashomati Thakur यांचे हे ट्विट. आपल्या ताफ्यातील या वाहन चालकास सॅल्युट मारला.

मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती ठाकूर यांच्या वाहनाचं ते राज्यभरात चालक म्हणून ते सारथ्य करीत असतात. मारुतीराव यांची आज सेवानिवृत्ती आहे. कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचं औक्षण करून तसेच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना मंत्री ठाकूर यांनी चक्क सॅल्यूट केला तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मंत्र्यांच्या सॅल्युटला मारुतीराव किन्हाके यांनी सॅल्युट केला.
पेज नेव्हिगेशन