दक्षिण नागपूर सहकार आघाडी कार्यकारिणी घोषित | Bjp Nagpur - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २१, २०२१

दक्षिण नागपूर सहकार आघाडी कार्यकारिणी घोषित | Bjp Nagpur

भाजपा सहकार आघाडीच्या दक्षिण नागपूर कार्यकारिणीची घोषणा नुकतीच एका छोटेखानी समारंभात उत्साही वातावरणात करण्यात आली, अध्यक्षपदी विश्वनाथ कुंभलकर तर महामंत्री पदी अधिवक्ता ॲड. दीपाली अश्विन ढोमणे आणि श्री. नंदेश सावरकर यांची वर्णी लागली. तसेच शहर महिला प्रमुख म्हणून दीपाली अवचट तर उपाध्यक्ष म्हणून श्री. घोडमारे यांची घोषणा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय भेंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहर महामंत्री रामभाऊ आंबूलकर, सहकार आघाडी पूर्व विदर्भ संयोजक राजेंद्र घाटे, स आ नगर अध्यक्ष कीशोर भागडे, महामंत्री आणि दक्षिण नागपूर स आ प्रभारी अनिल देव, शहर संपर्क प्रमुख वैशाली हनोते तसेच राजू नागुलवार, विश्वनाथ कुंभलकर मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना संजय भेंडे म्हणाले की, 'भाजपा सहकार आघाडीने सहकार क्षेत्रातील सोसायटी, बँका आणि इतर संस्थाशी संपर्क साधून त्यांच्या समस्यां जाणून घेऊन त्याच्या पूर्ततेसाठी सतत पाठपुरावा करावा"

सुरवातीला स आ नगर महामंत्री अनिल देव यांनी प्रास्ताविक केले, नंतर रामभाऊ आंबूलकर, राजेंद्र घाटे, किशोर भागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, 
कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना बाधितांना मदत करणाऱ्या कोरोना योध्यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला, वैशाली हनोते यांनी आभार मानले
आणि नंतर पुढीलप्रमाणे दक्षिण मंडळ सहकार आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,
अध्यक्ष- विश्वनाथ कुंभलकर, महामंत्री- ऍड दीपाली ढोमणे, नंदेश सावरकर.
उपाध्यक्ष - श्री. घोडमारे