स्वातंत्र्यदिनी देवलगाव जवळ ट्रकची दुचाकीला जबर धडक, दोन गंभीर जखमी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, ऑगस्ट १६, २०२१

स्वातंत्र्यदिनी देवलगाव जवळ ट्रकची दुचाकीला जबर धडक, दोन गंभीर जखमी

 स्वातंत्र्यदिनी देवलगाव जवळ ट्रकची दुचाकीला जबर धडक, दोन गंभीर जखमीसंजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध ता.१६ ऑगस्ट:-

ब्रह्मपुरी वरून स्वगावी परसोडी रयत येथे दुचाकीवर येत असलेल्या एका विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने देवलगाव शिवारात जबर धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाला. तर ट्रक मध्ये बसून प्रवास करणारा मध्य प्रदेशातील राजनांदगाव येथील एक इसम गंभीररित्या जखमी झाला आहे. दुचाकीचालक नरेन्द्र प्रभुजी पेटकुले 28 वर्षे राहणार परसोडी रयत तालुका अर्जुनी मोरगाव, सुखीराम मनकूर पंधरे राहणार राजनांदगाव ही जखमींची नावे आहेत. ही घटना काल दिनांक १५ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान नवेगाव बांध अर्जुनी मोरगाव राज्य महामार्गावर देवलगाव आश्रम शाळेजवळ घडली.

नरेंद्र पेटकुले हा आपला भाचा रोहित लेनगुरे राहणार चापटी याला काका मनोहर पेटकुले रा. ब्रम्हपुरी यांचेकडे १४ ऑगस्ट रोजी पोचवून दिले. तो १५ ऑगस्ट रोजी संदीप पेटकुले यांची बजाज पल्सर मोटर सायकल क्रमांक एमएच ३५, झेड ५२०२ घेऊन स्वगावी परसोडी रयत येथे परत येत होता. देवलगाव येथील राज्य मार्ग कोहमारा अर्जुनीमोरगाव वरील नथुजी पुस्तोडे आश्रम शाळेजवळ कोहमाऱ्या वरून अर्जुनी मोरगाव कडे भरधाव वेगात जात असलेल्या, ट्रक क्रमांक युपी-१३ एपी-१०४२ ने दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान जबर धडक दिली. या झालेल्या अपघातात नरेन्द्र प्रभूजी पेटकुले वय २८ वर्षे राहणार परसोडी रयत तालुका अर्जुनी मोरगाव हा गंभीर जखमी झाला. तर राजनांदगाव येथील एक इसम सुखीराम मनकुर पंधरे हा या ट्रकमध्ये प्रवास करीत होता. अपघात एवढा जबर होता की तो ट्रकच्या केबिनमध्ये फसून गंभीर जखमी झाला. घटनास्थळी आलेल्या नवेगावबांध पोलिसांनी त्याची कशीबशी सुटका केली व दोन्ही गंभीर जखमींना ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल केले .प्राथमिक उपचारानंतर दोन्ही गंभीर जखमींना जिल्हा केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. जखमी नरेंद्र याचा उपचार सहयोग हॉस्पिटल गोंदिया येथे सध्या सुरू आहे. ट्रक चालकावर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.