आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांचा दौरा - १० ऑगस्ट ते २८ सप्टेंबर २०२१ | Aam adami party maharashtra - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ ऑगस्ट २०२१

आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांचा दौरा - १० ऑगस्ट ते २८ सप्टेंबर २०२१ | Aam adami party maharashtra

गेले १६ महिने कोविड व लॉक डाऊन च्या काळात सर्व नियमांचे काटेकोर पालन करत केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षाचे सर्व कार्यक्रम गाव, तालुका, शहर व जिल्हा पातळीवर यशस्वीपणे राबविल्या बद्दल राज्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.


आम आदमी पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मेहनत करणारे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे चांगला रुजत असून, वेगाने वाढत आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनती बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांचा सुद्धा या प्रक्रियेमध्ये सिंहाचा वाटा आहे. या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणारे त्यांचे कुटुंबीय हा आम आदमी पार्टी परिवाराचा अविभाज्य भाग आहे.


जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला चांगले यश मिळाले असून येणाऱ्या काळातील महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वजण जोमाने कामाला लागले आहेत. या निवडणुका पार्टीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. या निवडणुकांची तयारी आणि कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भूमिका ऐकून शहरांच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी मंगळवार दिनांक १० ऑगस्ट २०२१ पासून राज्याचा दौरा करणार असून या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे:


कार्यक्रम

१. कार्यकर्ता मेळावा व निवडणुकीच्या तयारीचा आढावा

२. पत्रकार परिषद

३.शहरातील महत्वाच्या व्यक्तींशी भेटीगाठी


पहिला टप्पा

१० ऑगस्ट मंगळवार - वसई विरार : (पालघर जिल्हा)

१० ऑगस्ट मंगळवार - मीरा भायंदर : (ठाणे जिल्हा)

११ ऑगस्ट बुधवार - ठाणे शहर, नवी मुंबई

१२ ऑगस्ट गुरुवार - कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर : (ठाणे जिल्हा)


दुसरा टप्पा

१७ ऑगस्ट मंगळवार - मालेगाव शहर

१८ ऑगस्ट बुधवार - जळगाव         

१९ ऑगस्ट गुरुवार - नाशिक शहर

२० ऑगस्ट शुक्रवार - अहमदनगर      

२१ ऑगस्ट शनिवार       बीड


तिसरा टप्पा                            

१ सप्टेंबर बुधवार - पिंपरी चिंचवड  

२ सप्टेंबर गुरुववार - पुणे शहर

३ सप्टेंबर शुक्रवार - कोल्हापूर

४ सप्टेंबर शनिवार - सांगली

५ सप्टेंबर रविवार - सोलापूर            


चौथा टप्पा

१२ सप्टेंबर रविवार - औरंगाबाद

१३ सप्टेंबर सोमवार - जालना, हिंगोली

१४ सप्टेंबर मंगळवार - बुलढाणा, नांदुरा

१५ सप्टेंबर बुधवार - अकोला, बाळापूर            

१६ सप्टेंबर गुरुवार - अमरावती, चांदुर रेल्वे

१७ सप्टेंबर शुक्रवार - वर्धा, हिंगणघाट


पाचवा टप्पा

२४ सप्टेंबर शुक्रवार - नागपूर,  

२५ सप्टेंबर शनिवार -  घुघ्घूस,  चंद्रपूर,

२६ सप्टेंबर रविवार - बल्लारशाह शहर, सिंदेवाही,

२७ सप्टेंबर सोमवार - गडचिरोली, वाडसा-देसाई गंज

२८ सप्टेंबर मंगळवार - भंडारा, तुमसर


सर्व जिल्हा, तालुका, शहर समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विभागीय समिति सोबत संपर्क करावा आणि या दौऱ्याच्या नियोजनामध्ये सक्रियपणे सहभागी होवून दौरा यशस्वी करावा ही नम्र विनंती.आम आदमी पार्टी महाराष्ट्र करिता,

रंगा राचूरे - संयोजक

किशोर मांध्यान - सह संयोजक

विजय कुंभार - संघटन मंत्री

धनंजय रामकृष्ण शिंदे - सचिव