"चंद्रपूर मे भी केजरीवाल" : आम आदमी पक्षाला नोटीस - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २८, २०२१

"चंद्रपूर मे भी केजरीवाल" : आम आदमी पक्षाला नोटीस

 चंद्रपूर :  आम आदमी पक्षातर्फे संपूर्ण शहरात "चंद्रपूर में भी केजरीवाल" हे वॉल पेंटिंग अभियान चालू होते.  त्यामध्ये शहरातील अनेक भिंतीवर चंद्रपूर मे भी केजरीवाल हे लिहिण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहरात येणाऱ्या जाणाऱ्या अनेक नागरीकांना येता जाता हे लिखाण दिसत आहे. या लिखाणामुळे अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षाची लोकप्रियता वाढत असून, लोकांना दिल्ली मॉडेल डोळ्या समोर येऊन दिल्लीत झालेली क्रांती, लोकांकरिता करण्यात आलेले विकासकामे लक्षात येत आहे. मात्र, चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आम आदमी पक्षाच्या वॉलपेंटिंगसंदर्भात नोटिस पाठविली आहे. 

सत्ताधारी स्वतःच्या नेत्यांचे बॅनर लावतात. रस्त्यावर, दुभाजकावर बेकायदेशीररित्या बॅनर लावण्यात आले आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता कर विभागाचा महसूल बुडवून बॅनरबाजी सुरु आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. फक्त आम आदमी पार्टीची शहरात एंट्री होताच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच नोटीस पाठवून अशी कारवाईची धमकी दिली आहे. 
चंद्रपूर में भी केजरीवाल  याच वॉल पेंटिंग मुळे लोकांमध्ये तर चांगला मॅसेज जात आहे पण विरोधकांच्या पोटात दुखत आहे म्हणून सत्ताधार्‍यांनी एकीकडे संपूर्ण शहर खड्ड्यात टाकलेल आहे आणि आम आदमी पक्षावर दबाव टाकण्याकरीता खालच्या पातळीवर गेले आहेत . एकीकडे भाजपा स्वतः स्ट्रीट लाइट वर विकास पुरूषांचे फोटो, महापौर तथा ईतर पदाधिकारी यांचे पोस्टर लाउन स्वता डोळे बंद करुण विद्रुपीकरण करीत आहेत, त्याकडे कोन बघणार? अमृत कलश योजनेच्या नावावर संपूर्ण शहरातील शासकीय रस्ते खोदून टाकले आहेत. पब्लिक प्राॅपर्टी डॅमेज करुण ठेवली आहेत., अशी टीका आप युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी केली आहे. 

प्रत्यक्षात महापौरांनी स्वतः वॉर्डात जाऊन अमृत कलश योजनेच्या संदर्भात , रस्त्याच्या संदर्भात विचारलं तर लोकांची काय प्रतिक्रिया आहे हे कळेल .त्यांनी स्वतः जाऊन एअर कंडीशन गाडीमध्ये व्हीआयपी नंबर ठेवून काही करता येत नाही त्यासाठी तुम्हाला लोकांपर्यंत जावे लागते. तळागळातले काम करावे लागते. हे तुम्हाला करता येत नाही आम आदमी पक्ष आता नावारुपास येत होता लोकांपर्यंत पोहोचून जनतेत प्रसिद्धि वाढत होती म्हणून आम आदमी पक्षाची लोकप्रीयता सहन न झाल्यामुळे राजकीय नेत्यांच्या पोटामध्ये दुखु लागले आहे आणि त्याच्याचमुळे आम आदमी पक्षा वर कुठे तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करु पहात आहे पण आम आदमी पक्ष या दबावतंत्रा समोर झुकनारा नाही आहे चंद्रपुरातील जनतेचा आम आदमी पक्षाने विश्वास प्राप्त केला आहे.


जेव्हा भाजपा पाच वर्षे हातात सत्ता असताना केंद्रापासून राज्यापासून तर महानगरपालिके मधे परिवर्तन केले नाही । पाच वर्षांच्या काळामध्ये स्वतः महानगरपालिकेने केलेले पाच काम सांगा. की स्वतः महापौराने इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी केलेत म्हणून। एकीकडे कचरा डेपोचा प्रकल्प अजूनही तसाच आहे तो अजूनही धुळ खात पडला आहे. इकडे तिकडे कचरा फेकला जातो आहे ,वॉटर ट्रीटमैंट प्लांट अजूनही जशाच्या तसाच आहे ,अमृत कलश योजना ही काय महानगरपालिकेची योजना नाही ही केंद्राची योजना आहे, महापौरांच्या काहीतरी डोक्यामध्ये काहीतरी कल्पक बुद्धी सुचली आणि सगळे घरोघरी नळ देतो असं काही नाहीये अमृत योजनेमुळे चंद्रपूरकरांनवर काही कृपा करीत नाहीये। तुम्ही कुठले उपक्रम राबवत आहे हे सगळे शासनाचे उपक्रम आहेत त्यात राज्य सरकार केंद्र सरकारचे आहेत. मनपाने कुठलेही नियोजन व्यवस्थित केलेले नाही आहे आणि आम्ही आम आदमी पक्षाच्या प्रसिद्धीसाठी वॉल पेंटिंग केली असेल तर तुम्ही आम्हाला नोटिस पाठविला आहे जशे काही आम्ही देशद्रोह केल्या सारखे कलम दाखवत असेल तर या वरुण हे लक्षात येते की सत्ताधारी किती घबरलेले आहे , आगामी निवडणूकीत लोकांचा असंतोष मतदानाच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांना दाखवणारच आहे, त्या मुळे आम आदमी पक्ष कुणाच्या दबावाने झुकणार नाही आहे । आम्हाला आमच्या पद्धतीने जे काही उत्तर द्यायचे होते ते आम्ही दिलेले आहे। ऐवढ्या गोष्टीसाठी त्याना आमच्यावर केस करायची असेल तर आप तयार आहे परंतु सत्ताधा-यासाठी ऐक न्याय आणी विरोधकासाठी दुसरा हे प्रशासणाला करता येणार नाही, असेही मयुर राईकवार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.