कोविड-19 जनजागृतीचे काम लोकचळवळ स्वरुपात करा- विभागीय आयुक्त सौरव राव | Saurav Rao - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०२ ऑगस्ट २०२१

कोविड-19 जनजागृतीचे काम लोकचळवळ स्वरुपात करा- विभागीय आयुक्त सौरव राव | Saurav Rao
पुणे, दि.2 कोविड-19 बाबत नागरिकांच्या मनात सकारात्मक बदल घडवून आणण्यसाठी प्रसार व प्रसिध्दीच्या माध्यमातून जनजागृतीचे काम लोकचळवळ स्वरुपात करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. 

        विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 जनजागृती विषयक आढावा बैठक पार पडली. यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. बाविस्कर, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे,  डॉ. दिलीप कदम, एनजीओ प्रतिनिधी मेधा काळे, युनिसेफ सल्लागार प्रविण पवार यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

       विभागीय आयुक्त सौरव राव म्हणाले, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांच्या मनात कोविड-19 बाबत जनजागृती होणे खुप महत्वाचे आहे. यासाठी मुद्रीत व इलेक्ट्रानिक माध्यमे, आकाशवाणी, एफ.एम. समाज माध्यमे यांच्या माध्यमातून सतत जगजागृती होणे गरजेचे आहे. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. 

     सार्वजनिक ठिकाणी वावरत असतांना कोरोनारुप वर्तवणूकीचे पालन केले पाहिजे. त्यामध्ये मास्कचा सतत वापर केला पाहिजे. वारंवार हात सॅनिटॉयझर केले पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. राव यांनी केले. 

        भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी कोविड-19 जनजागृती विषयक सुरु असलेल्या कार्यप्रणालीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

*