इयत्ता २ री ते १०वी साठी आता WhatsApp शाळा | WhatsApp | School | Teacher - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० जुलै २०२१

इयत्ता २ री ते १०वी साठी आता WhatsApp शाळा | WhatsApp | School | Teacher

स्वाध्याय उपक्रम येत्या शनिवार पासून म्हणजेच दिनांक १७ जुलै २०२१ पासून इयत्ता २ री ते १०वी साठी राज्यभरात सुरू होत आहे.

सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे स्वाध्याय मध्ये *मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत.*

विषय - भाषा (मराठी/उर्दू) व गणित

या वेळेस स्वाध्याय चे नंबर व लिंक हे प्रत्येक विभागासाठी वेगळे असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल.
*आपल्या जिल्ह्याची योग्य लिंक व क्रमांक इथे मिळतील:* https://cutt.ly/0mKkhXJ

*स्वाध्याय साठी नोंद करण्याची पद्धत -*
अतिशय साधी व सरळ पद्धत आहे.
सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंक ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी.
Ed
आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.

१. *नवीन विद्यार्थ्यांसाठी: वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.


२. *पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी:* वरील प्रक्रिया केल्यावर आपल्याला आपली सध्याची इयत्ता व शाळा विचारली जाईल. शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली इयत्ता नमूद करावी व शाळा बदललेली असल्यास नवीन शाळेचा योग्य UDISE क्रमांक (स्कूल कोड) नमूद करावा.

जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील, यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.

नागपूर विभागातील विद्यार्थ्यांनी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करावे
WhatsApp | School | Teacher