खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांच्या मध्यस्थीने ३८ दिवसाचे इंटकचे उपोषण मागे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१८ जुलै २०२१

खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांच्या मध्यस्थीने ३८ दिवसाचे इंटकचे उपोषण मागेशिरीष उगे (वरोरा/प्रतिनिधी)
: वेकोलितील येथील काही भष्ट अधिकारी, अनियमितता, कामगार कल्याण, सुरक्षा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इंटकचने विविध मागण्यांना घेऊन के. के. सिंग यांच्या नेतुत्वात ३८ दिवसापासुन अन्यत्याग आंदोलन करण्यात आले होते. काल दिनांक १७ जुलै रोजी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक साबीर यांचे उपस्थितीत इंटकचे नेते के. के. सिंग यांचे उपोषण मागे घेण्यात आले.
मागील काही वर्षा पासून वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे वेकोलि कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. याबाबत मागील सात वर्षांपासून पाठपुरावा करून देखील अधिकारी दखल घेत नव्हते. त्यामुळे इंटकचे नेते के. के. सिंग यांनी आंदोलन सुरु केले. त्यावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनातील मह्त्वाचे मुद्दे म्हणजे इंटक कार्यकर्त्याच्या आर्थिक व मानसिक शोषण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यासोबत महिला कर्मचाऱ्यांच्या शारीरिक शोषण केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु मागील १५ महिन्यापासून त्यांना न्याय मिळाला नाही. त्यासोबतच अन्य मागण्यासाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या गंभीर बाबींची दखल खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली. त्यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली. त्यानंतर खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर व वेकोलिचे ए. जि. एम साबीर यांची के. के. सिंग यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामध्ये खासदार बाळू धानोरकर यांच्या मध्यस्थीने वेकोलि अधिकाऱ्यांना स्थानिक स्थळावरील मागण्या ३ ते ४ दिवसात मार्गी लावण्याच्या व वरिष्ठ स्थरावरील मागण्या १५ दिवसात मार्गी लावण्याचे सांगितले. खासदार धानोरकर हे कोल इंडिया कमिटीचे सदस्य असल्याने काही मागण्या तिथे देखील उपस्थित करणार आसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कामगार व अधिकाऱ्याचे सर्व मागण्यांवर एकमत झाले. त्यानंतर के. के. सिंग यांना जूस पाजून आंदोलनाची सांगता झाली. यावेळी वेकोलिचे क्षेत्रीय अधिकारी साबीर जी, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रझा इंटक अध्यक्ष प्रशांत भारती, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, युवा नेते नितीन भटारकर, कुणाल चहारे राजेश अडूर, बसंत सिंग, यांची उपस्थिती होती.