जिवती तालुक्यातील आदिवासी पट्टेधारकांना तात्काळ सातबारा द्या : डॉ. मधुकर कोटणाके व बंडू मडावी यांची मागणी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, जुलै १५, २०२१

जिवती तालुक्यातील आदिवासी पट्टेधारकांना तात्काळ सातबारा द्या : डॉ. मधुकर कोटणाके व बंडू मडावी यांची मागणीउपविभागीय अधिकारी राजुरा यांचे वेधले लक्ष

जिवती तालुक्यातील आदिवासींच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष- डॉ. मधुकर कोटणाके

राजुरा/ प्रतिनिधी
दिनांक - १५/७/२०२१

जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी वास्तव्यास असून जिवती तालुक्यातील वनहक्क पट्टे धारकांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावा व सातबारा देण्यात यावा अशी मागणी आफ्रोट चे तालुका अध्यक्ष व इंडियन मानवाधिकार असोसिएशन चे राज्य उपाध्यक्ष बंडू मडावी यांनी निवेदनातून केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी जिवती तालुक्यातील आदिवासींच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी बंडू मडावी व डॉ. मधुकर
कोटणाके यांनी केली आहे.

राजुरा उपविभागीय अधिकारी श्री.खलाटे यांना निवेदन देऊन पट्टे धारकांना सातबारा देण्यात यावा व भूमिअभिलेख कार्यालय मार्फत होत असलेल्या मोजनित पारदर्शकता आणण्यासाठी मोजनीचा वेळापत्रक आखावा व वनहक्क पट्टे धारकांना शेतीच्या योजना देण्यात याव्या अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी खलाटे यांनी निवेदनाच्या अनुषंगाने
कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी, डॉ. मधुकर कोटणाके, बंडू मडावी, निळकंठ साळवे, रमेश आडे, लोमेश मडावी, इत्यादी उपस्थित होते.