शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय ठेवा : तहसीलदार हरीश गाडे - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जुलै ०६, २०२१

शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय ठेवा : तहसीलदार हरीश गाडे
चुनाळा येथे जनजागृती कार्यक्रम

राजुरा/ प्रतिनिधी
कोविड -19 ची तिसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी जिल्हयात मोठया प्रमाणावर लसीकरण होणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी लसीकरणाचो गती वाढविणे गरजेचे आहे . तसेच कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वर त्यानंतर - म्यूकरमायकोसिस " या आजारावर मात करण्यासाठी नागरिकाने मधुमेह बाबत तपासणी करुन येणे अत्यावश्यक आहे . कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क , सोशल डिस्टनस व संनिटायझर या त्रि :सुत्रीचा वापर करा व शासन निकषाप्रमाणे पात्र असलेल्या सर्व नागरिकांचे लसीकरण 100 टक्के करण्याचे आवाहन तहसीलदार हरीश गाडे यांनी चुनाळा येथे मार्गदर्शन करताना केले.
कोवीड -19 व म्युकरमायकोसिस आजार - उपचार प्रतिबंध उपाययोजना तसेच लसीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या अनुषगांने चुनाळा येथील ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा गांधी सास्कृतीक भवन येथे महसुन विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी तहसीलदार गाडे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर,संरपच बाळासाहेब वडस्कर , नायब तहसीलदार गांगुर्डे ,पोलीस पाटील, गावातील आरोग्य विभागाचे कर्मचारी अंगणवाडी सेविका ,स्वस्त धान्य दुकानदार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात ग्रामीण भागातील covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .तसेच लसीकरणाबाबत नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी शास्त्रीय माहिती देण्यात आले. याप्रसंगी, माजी आमदार सुदर्शन निमकर, सरपंच बाळू वडस्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.