कर्मचारी भरती आयोगाचा निकाल लागेना; परीक्षार्थीं चिंतेत | Staff Selection Commission - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२५ जुलै २०२१

कर्मचारी भरती आयोगाचा निकाल लागेना; परीक्षार्थीं चिंतेत | Staff Selection Commissionमंगेश दाढे  / नागपूर : 

कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे. याचा फटका केंद्र सरकारच्या कर्मचारी भरती आयोगाच्या (एसएससी / Staff Selection Commission ) परीक्षांवर दिसत आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल अद्याप घोषित झालेले नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरवर्षी आयोगाकडून केंद्र सरकारच्या विविध विभांगासाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) सनदी अधिकारी पदासाठी परीक्षा घेते. त्याच धर्तीवर कर्मचारी भरती आयोगाकडून श्रेणी चतुर्थ, तृतीय, द्वितीय वर्गासाठी परीक्षा घेतल्या जातात.

मात्र, २०१८,२०१९ आणि २०२० या वर्षात घेण्यात आलेल्या कनिष्ठ-वरिष्ठ हिंदी भाषांतर परीक्षा, कनिष्ठ इंजिनीअर (सिव्हील,मेक्यानिकल,इलेक्ट्रीकल) या परीक्षांचे निकाल अजूनपर्यंत प्रलंबित आहेत. लॉकडाऊन असल्यानेही कर्मचारी भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे. देशातील कोविड - १९ विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचे आयोगाने ठरविले होते. त्यानुसार १ जून २०२० रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर Staff Selection Commission आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करेल. आयोगाने नवीन परिपत्रक जारी केले. त्यानुसार कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम, ज्युनियर इंजीनियर, स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर, कनिष्ठ-वरिष्ठ हिंदी भाषांतर परीक्षा, कनिष्ठ इंजिनीअर(सिव्हील,मेक्यानिकल,इलेक्ट्रीकल) परीक्षांचा निकाल जुलै ते नोव्हेंबरपर्यत लागण्याची शक्यता आयोगाकडून व्यक्त केली जात आहे. पण, आधीच या परीक्षांचे निकाल लावण्यास विलंब झालेला आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन परीक्षार्थीना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

प्रश्नचिन्ह कायम

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लिपिक,लेखापाल (मल्टीटास्किंग) या पदांसाठी १ जुलै २०२१ ते २० जुलै २०२१ रोजी परीक्षा होणार होती. तर केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी १२ जुलै २०२१ रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या परीक्षा कधी होणार?यावर आयोगाने निर्णय घेतलेला नाही.Staff Selection Commission Website https://ssc.nic.in/


पेज नेव्हिगेशन