डाॅ. सोहम पंड्या यांनी सांगितला उद्योगाचा मूलमंत्र | Soham-pandya - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२१ जुलै २०२१

डाॅ. सोहम पंड्या यांनी सांगितला उद्योगाचा मूलमंत्र | Soham-pandyaभारतीय ग्रामीण उद्योग आंणि उत्पादने कालक्रमणेत अनेक कारणांनी मागे पडली असली तरी, त्यांचे आज पुनरुज्जीवन झाले तर विश्व बाजारालाही समर्थपणे आपण तोंड देऊ शकतो,असे प्रतिपादन आज 23 व्या ग्रामायण सेवागाथेत वर्धा (दत्तापूरच्या) सेंटर ऑफ सायन्स फाॅर व्हिलेजेस,(सीएसव्ही) चे डाॅ.सोहम पंड्या यांनी आज येथे बोलताना केले.उद्योजकता विकास,गृहनिर्माण,स्वच्छता,नुतनीकरणक्षम ऊर्जा,ग्रामीण उद्योग ,कृषी आणि वनीकरण यावर त्यानी वैशिष्ठ्यपूर्ण विचार मांडले..

   ते म्हणाले , प्रत्येक परिसराने त्यांच्या भागात असणा-या नैसर्गिक साधनांचा निसर्गाच्या कलाने विचार करून प्रकीया उद्योग केले तर परिसराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही.गरजा आपल्या भागातच पूर्ण होतील.अतिरिक्त भाग बाहेर जाईल .आंतरिक रोजगार निर्माण होतील.अनेक सामाजिक आर्थिक प्रश्न अपोआप सुटतील..शांतता, सुव्यवस्था हे विकासाचे मूलमंत्र आहेत..

साखरेच्या उत्पादनासाठी ऊस पीकाला हेक्टरी 2000एम.एल. पाणी लागत..म्हणजे 6 टक्के उस पिकाला 60 टक्के ओलित, इतर पिकासाठी काय ? या पेक्षा पाम,ताड,सिंधी झाडापासून निघणा-या द्रवापासून गुळ, साखर बनते..एका झाडापासून 250 लीटर नीरा उपलब्ध होते,ज्यात 40 किलो साखर उत्पादित होऊ शकते,16 टक्के गुळ निर्माण होउ शकतो. एका झाडाला तीन लिटर पाणी लागतं.ही झाड देशभर डांबरी रस्ते,रेल्वे रूळ,अशा ठिकाणी लावली तरी देशाला लगणा-या गुळ, साखरेचा प्रश्न सुटेलच, शिवाय गावातल्या गावात रोजगार उपलब्ध होइल..अर्थात यासाठी अगदी प.नेहरूजींच्या    काळापासून गांधीवाद्यांचे प्रयत्न होते. गजानन नाइक यांनी त्यावेळी सुरू केलेले ताड गुड जागृती प्रयत्न सर्वाना माहिती आहेत. ते होऊ शकले नाही.तसे झाले तर छोटे. छोटे प्रक्रिया उद्योग, महिला  गृहउद्योग, हाताला रोख मिळू शकते ..पण यासाठी बी होऊन स्वतःला जमिनीत गाडून घ्यावे.लागेल.बीचे कोंब होऊन झाड होईल.सुजलाम सुफलाम ग्रामाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. कापसा पासून कपडा ,चळवळ अशीच आहे..आजही पश्चिम बंगाल,बंगालच्या इतरही भागात ताड,सिंधी,नारळाच्या झाडापासून गुळ ,तयार करतात. अशा छोट्या छोट्या बाबी निवडून तरूणांनी खेडी जागवावी. त्यासाठी ग्रामायण सारख्या संस्थाकडे वळावे, असेही ते म्हणाले.

शेतक-यानी पिकांमध्ये बदल करीत मागणी पुरवठा निकड आणि नाविन्यपूर्ण पिकांची निवड करीत प्रक्रियावरही भर दिला तर कृषीचा कायाकल्प दूर नाही..आपल्या शेतक-यांना त्याचे उपजत ज्ञान आहे.त्यानी ते उपयोगात आणावे.आज आपण बाजारात मिळणा-या मोजक्या भाज्याचा उपयोग करतो.वास्तविकता आपल्या वन्य बांधवांना शेकडो खाण्याच्या भाज्या माहिती आहेत .ते त्यांचा उपयोग करतात..पण शहरात भाज्यांच्या मर्यादीत उपलब्धतेने त्याच्या किमती वाढत्या असतात. त्याना पर्याय देण्याचे काम कोणी केले तर भाज्यामधील स्पर्धा कमी होऊन नाविन्यपूर्ण भाज्यांचे पीक फायदेशीर ठरेल.अज्ञात वासात असणा-या भाज्यांचे नष्टचैर्य थांबेल.

निंबोळी पासूनचे अवघ्या 150 रूपयात होणारे किटक नाशक 1800,1500,रूपये दराने शेतक-याना मिळू शकेल.शिवाय गावातच निर्मिती गावक-याना हाताला काम , निसर्गाच्या साखळीला धोका नाही..अशा विविधापूर्ण माहितीचे ऊर्जा,स्वच्छता,जल,जमिन ,जंगल याचा चौफेर आढावा घेत डाॅ.पंड्या यानी श्रोत्यांची मने जिंकत सामाजिक मानसिकतेला हात घातला.प्रा.शिवसिंह बघेल यांनी प्रारंभी प्रास्ताविक आणि परिचय करून दिला.