१७ जुलै २०२१
राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक बबन उरकूडे तर तालुका प्रमुखपदी राजू डोहे @shivsena
नवानियुक्त कार्यकारणी जाहीर
राजुरा/ प्रतिनिधी
राजुरा नगर परिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेत राजुरा विधानसभा क्षेत्रसह राजुरा तालुका शिवसेनेची बळाकटी व पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता नुकतीच जंबो कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक म्हणून बबन उरकूडे, राजुरा तालुका समन्वयक वासुदेव चापले यांची निवड करण्यात आली.राजुरा तालुका प्रमुख म्हणून नगरसेवक राजू डोहे यांची तर शहर प्रमुख म्हणून निलेश गंपावार यांची नियुक्ती चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांनी केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, उपजिल्हा प्रमुख संदीप करपे सह पदाधिकारी उपस्थित होते.
राजुरा विधानसभा क्षेत्र तसे पाहता भाजपा शिवसेना युतीत असतांना नेहमी शिवसेनेला विधानसभेचे तिकीट मिळायचे परंतु नंतर युती तुटल्याने भाजपा वेगळी लढली आणि भाजपा चा पहिला आमदार म्हणून एड. संजय धोटे यांच्या गळ्यात माळ पडली. मात्र राजुरा विभानसभा काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नवानियुक्त कार्यकारनीला जुने -नवे चेहऱ्याचा समन्वय साधत राजुरा विधानसभेत शिवसेनेची ताकत वाढविण्याचे तगडे आवाहन आहे. नवानियुक्त पदाधिकऱ्याचे अभिनंदन अमोल कोसूरकर, रमेश झाडे, बंटी मालेकर, नितेश राजुराकर, मोनू सूर्यवंशी, समीर शेख, गणेश चोथले, जावेद शेख, बाळू कुईटे, ललित शैरगील, पापा यादव, सचिनशिंह बैस यांनी अभिनंदन केले.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
