जंगलात नेमके काय घडले? त्याने केला सायंकाळी शालूचा खून | khabarbat news Chandrapur - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जुलै २०, २०२१

जंगलात नेमके काय घडले? त्याने केला सायंकाळी शालूचा खून | khabarbat news Chandrapur

khabarbat news | breaking news | chandrapur
चंद्रपूर - 
सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान बबलू शिंदेवार हा पत्नी शालूसोबत सरपनासाठी जंगलात गेले होता. जंगलात पती-पत्नीत नेमके काय झाले? याची कल्पना कुणालाच नाही. मात्र, पती बबलू शिंदेवार यांनी अंदाजे ४० वर्षीय पत्नीला जबर मारहाण करून जागीच ठार केले. पत्नीला ओढत नेऊन झुडपात झाकून ठेवले. 

चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथे जंगम नागरिकांची जंगमपूरी वस्ती आहे. गावोगावी फिरुन भांडे विकने व उदरनिर्वाह करणे हा जंगम नागरिकांचा लघु व्यवसाय आहे.सरपनाच्या निमित्ताने बबलू शिंदेवार यांनी पत्नी शालुला  जांभुळघाटलगत असलेल्या जंगलात नेले. जंगलातच पत्नी शालूचा खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पत्नीचा खुन केल्यावर पती बबलू शिंदेवार हा मौजा जांभूळघाट गावात आला. मात्र, पत्नी शालु परत न आल्याने तिचा खून केल्याची चर्चा सुरु झाली. 

  भिसी पोलिस स्टेशनला सदर खुन प्रकरणाची माहिती दिली असून, ठाणेदार मनोज गभणे आपल्या ताफ्यासह आले व पंचनामा करून उत्तरनिय तपासणी साठी शालुचा मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आरोपी बबलू शिंदेवार हा फरार झाला. भिसी पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. 


chandrapur Chimur Murder Case Crime