स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी : महापौर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१७ जुलै २०२१

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी : महापौर

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी


महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन
चंद्रपूर/ प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जीवनशैली बदलल्यामुळे आईसह बाळ निरोगी असणं फार महत्वाचं आहे. परंतु प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात बऱ्याच तक्रारी निर्माण होतात. अनेक ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होते. गायनेकॉलॉजिस्ट म्हणजेच स्त्रीरोगतज्ञ हे आज महिलांचे आधार आहेत. स्त्रीरोगतज्ञ एक डॉक्टर म्हणून आणि एक महिला म्हणून जे महिलांशी संबंधित सर्व समस्या समजून घेऊ शकते. आज कोरोनासारखा आजार आपण अनुभवत आहोत. अशावेळी सर्वानी निरोगी जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी देखील व्यवसाय म्हणून न बघता सेवाभाव म्हणुन पुढे येण्याची आज गरज आहे. कारण, रुग्ण आपल्याकडे ईश्वराच्या रूपाने बघत आहे, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

गंज वाॅर्ङ येथील आयएमए सभागृहात आयोजित चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गेनेकोलॉजिकल सोसायटीच्या पदस्थापना सोहळ्यात बोलत होत्या.
यावेळी मावळत्या अध्यक्ष डॉ. कीर्ती साने व सचिव डॉ.पल्लवी इंगळे यांनी नवीन अध्यक्ष डॉ. कविता गांधी व सेक्रेटरी डॉ. प्रिया शिंदे यांना पदभार सुपूर्द केला.
यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, स्त्री ही कुटुंबाचा सांभाळ करणारी प्रमुख व्यक्ती आहे. ती वेगवेगळ्या रूपात असते. कधी बहीण, कधी मुलगी तर कुणाची बायको तर कुणाची आई देखील होते. जीवनात या भूमिका वठवीत असताना मात्र, ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अनेक महिला म्हणा तरुणी आपला आजार पुरुष डॉक्टरांना सांगालाला संकोचतात. अशावेळी महिलांना एकमेव आधार म्हणजे स्त्री डॉक्टर. आज विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. आपल्यासारखे स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध होत असल्याने महिलांच्या आरोग्यावर उपचार शक्य होत आहेत.

यावेळी डॉ. कीर्ती साने व सेक्रेटरी डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. कविता गांधी डॉ. प्रिया शिंदे, डॉ. समृद्धी आईंचवार , डॉ. मनीषा घाटे, डॉ.ज्योती चिद्दरवार, डॉ. वृषाली बोंडगुलवार, डॉ.वंदना रेगुंडवार, डॉ. इंदू अग्रवाल,डॉ. शलाका मामिडवार, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. नीलिमा मुळे, डॉ. शर्मीली पोदार, डॉ. ऋतुजा मुंधडा, डॉ. अभिलाषा गावतुरे आदींची उपस्थिती होती.