पेगासस हेरगिरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी करा pegasus scandle - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ जुलै २०२१

पेगासस हेरगिरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी करा pegasus scandle

 पेगासस हेरगिरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी करा

बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांची मागणी

 

मुंबई२९ जुलै

देशातील विरोधी पक्षाचे नेतेपत्रकार तसेच इतर नामवंताची हेरगिरी केल्याचा आरोप केंद्रातील मोदी सरकारवर केला जात आहेविरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'पेगासस स्पायवेयर'संबंधी संयुक्त संसदीय समिती (जेपीसीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीकरिता रान उठवले आहेअशात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या देखरेखीखाली पेगासस हेरगिरी प्रकरणाचा तपास करावाअशी विनंती बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी केली.


संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देशलोकहितशेतकरी तसेच इतर अती महत्वाच्या मुद्यावर सरकार तसेच विरोधकांमध्ये अविश्वास तसेच गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु नाहीपेगासस हेरगिरी प्रकरण देखील बरेच गाजत आहेअसे असतांना सुद्धा या मुद्यावर तपास करण्यास केंद्र सरकार धजावत नाहीत्यामुळे देश चिंतेत आहेतअशी भावना बसपा प्रमुख सुश्री बहन मायावती जी यांची आहे.

 

अशात प्रकरणासंबधीचे खरे रूप देशवासियांच्या समोर यावे याकरिता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुचर्चित पेगासस हेरगिरी प्रकरणाची स्वतःहून दाखल घेत आपल्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करावीअशी विनंती सुश्री बहन मायावती जी यांनी गुरुवारी केली असल्याचे अँड.ताजने म्हणालेप्रकरणाची निष्पक्षरित्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत चौकशी झाली तरहेरगिरीप्रकरणाचे खरे रूप देशवासियांच्या समोर येईलएवढा आरोपटीका होत असताना देखील निगरगट्ट सरकार चौकशीला धजावत नसल्याने पेगासस प्रकरणी नक्कीच काही काळबेर असल्याचा आरोप अँड.ताजने यांनी केला.pegasus scandle