बाकटी येथील पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख ओमप्रकाश वासनिक यांचा सपत्नीक सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ जुलै २०२१

बाकटी येथील पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख ओमप्रकाश वासनिक यांचा सपत्नीक सत्कार

बाकटी येथील पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख ओमप्रकाश वासनिक यांचा सपत्नीक  सत्कार


संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध ता.२ जुलै:-


जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तथा केंद्र शाळा बाकटी येथील पदवीधर शिक्षक तथा केंद्रप्रमुख ओम प्रकाश वासनिक हे  दि.३०जुन रोज बुधवारला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी शिलाताई यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांना निरोप देण्यात आला. ओमप्रकाश वासनिक हे  कास्ट्राईब संघटना जिल्हा अध्यक्ष, विद्यार्थीप्रिय, पदवीधर  शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे उर्वरित भावी आयुष्यासाठीसुख-शांती,दिर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.विषय शिक्षक एन. बी. लंजे,सहायक शिक्षक एस. एच. चांदेवार,शिक्षिका एन. एम. मुरकुटे ,एम आर सुर्यवंशी,प्रमोद बांगडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष मेश्राम, महादेव वाघमारे, सुनील  द्रुगकर, कैलाश मेश्राम, मंदाताई मांढरे,  लिलाबाई राजगिरे, उर्मिलाताई मडावी, गावातील पालक व प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.