बेझनबाग येथील भूमिगत लघुदाब वाहिनीच्या कामाचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ जुलै २०२१

बेझनबाग येथील भूमिगत लघुदाब वाहिनीच्या कामाचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन
नागपूर,दि. १९जुलै २०२१:उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील बेझनबाग परिसरातील भूमिगत लघुदाब वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. या मतदारसंघात ऊर्जा विभागाची ८ कोटी ७३ लाखाची कामे प्रगतीपथावर असून त्यामुळे वीज ग्राहकांना अधिक शाश्वत व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते बेझनबाग बुद्धविहार जवळील ३ स्पनच्या उपरी लघुदाब वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचे भूमिपूजन आज सोमवारी १९ जुलैला करण्यात आले. या प्रसंगी नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे,सिव्हिल लाइन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीधर सोरटे,उपकार्यकारी अभियंता निशा चौधरी,उपअभियंता सचिन भागवत, नागपूर महानगर पालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्याय प्रामुख्याने उपस्थित होत्या.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ही कामे करण्यात येत असून यात नवीन रोहित्रांची स्थापना,एरिअल बंच केबलिंग,स्थापित रोहित्रांची क्षमता वाढविणे,अपघातप्रवण उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे स्थलांतरन व उपरी वाहिन्या भूमिगत करणे तसेच समाजातील विशेष घटक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वीज जोडणी देणे अशा स्वरूपांच्या कामांचा समावेश आहे. या कामामुळे या मतदार संघातील ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.