आकडेबाज वीज ग्राहकावर वीज चोरीचा गुन्हा | @MSEDCL - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२१ जुलै २०२१

आकडेबाज वीज ग्राहकावर वीज चोरीचा गुन्हा | @MSEDCL

नागपूर, दिनांक २१जुलै२०२१-

मुबलक प्रमाणात वीज वापरून वीज देयकाची रक्कम न भरल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यावर वीज वाहिनीवरून अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकाच्या विरोधात कळमना पोलिसांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महावितरणचे सहाय्यक अभीयंता अक्षय कोंबाडे हे कार्यकारी अभीयंता राहुल जीवतोडे, अतीरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत भाजीपाले यांच्या  आदेशानुसार बेलेनगर,कामना नगर परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकांकडून थकबाकीची वसुली करीत होते.या परिसरात राहणारा वीज ग्राहक आतीक सिद्वीक्की या ग्राहकाकडे २लाख २३ हजार रूपयांची थकबाकी असल्याने मार्च-२०२१ मध्ये महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. थकबाकीची रक्कम भरून वीजपुरवठा नियमित करण्या एवजी आतीकने नर्गिस नामक महिलेस हाताशी धरून वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृतपणे वीज वापर सुरू केला. ही बाब महावितरणचे सहाय्यक अभीयंता अक्षय कोंबाडे यांच्या निदर्शनास आली.कोंबाडे यांनी कळमना पोलिस ठाण्यात धाव घेतली.कळमना पोलिसांनी आतीक सिद्धीक्की आणि नर्गिस नामक महिलेच्या विरोधात वीज कायदा २००३ कलम १३८  नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वीज देयकाची थकबाकी राहिल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला आहे. अशा वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून वीजपुरवठा अधिकृतपणे घेण्याचे आवाहन नागपूर परिमंळाचे मुख्य अभीयंता दिलीप दोडके यांनी केले आहे.संबंधित शोध


संबंधित शोध