दहावीच्या निकालाची तारीख जाहीर । इथे बघू शकता निकाल Maharashtra SSC Results 2021 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ जुलै २०२१

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर । इथे बघू शकता निकाल Maharashtra SSC Results 2021
मुंबई, 15 जुलै:  दहावीचा निकाल दि.16 लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्रालयानं (The Ministry of School Education) ही माहिती दिली. याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र एसएससीचा निकाल 2021 च्या (Maharashtra SSC Results 2021) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल. 

सोशल मीडियावर आज दहावी निकाल लागणार असल्याची चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्रालयानं यावर स्पष्टिकरण दिलं आहे. तसंच दहावी निकाल याबाबत पूर्व कल्पना याची माहिती अधिकृत कळवण्यात येईल, असंही शालेय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

कोरोनामुळे राज्यात एसएससी बोर्डाची परीक्षा 2021 रद्द करण्यात आली होती. यावर्षी निकालासाठी राज्य शिक्षण विभागानं मूल्यांकन असा पर्याय आणला आहे. समोर आलेल्या अन्य माहितीनुसार महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 चे निकाल 16 जुलै 2021 पर्यंत जाहीर केले जातील. काही वृत्तांत असं समोर आलं आहे की, दहावी आणि बारावीचे निकाल थोडे पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. एसएससीचा निकाल 16 जुलै ला लागणार आहे, तर बारावीच्या निकालाही उशीर होणार असून, 2 ऑगस्टपर्यंत जाहीर होईल.

 विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता पाहता येईल 

💁‍♂️ असा करा निकाल चेक 

▪️ दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा निकाल 
▪️ या वेबसाईटवर पाहता येणार आहे