Lockdown Story : संचारबंदीत उभारला उद्योग; कोरोनाने केला घात: एक वस्तू खरेदी करून द्या मदतीचा हात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ जुलै २०२१

Lockdown Story : संचारबंदीत उभारला उद्योग; कोरोनाने केला घात: एक वस्तू खरेदी करून द्या मदतीचा हात

कोरोनामुळे मागील वर्षीपासून लागलेल्या 'लॉकडाऊन'दरम्यान अनेकांचे कामधंदे, व्यवसाय हे सर्व बंद झाले. यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. हातावर पोट असणाऱ्या, अनेकांच्या संसाराचा गाड़ा मात्र अर्ध्यावर थांबला. अश्या अनेक परिवाराच्या मन हेलावणाऱ्या कहाण्या आहेत...

कार्यालयमधील पेंटिंग काम दरम्यान या व्यक्तिसोबत अल्पशी भेट झाली. मागील दीड वर्षापासून आपल्या पेंटिंग काम व्यतिरिक्त सीजनल अश्या आपल्या नव्या व्यवसायात गुंतवणूक करूनसुद्धा प्रत्यक्ष तो व्यवसाय सुरु होऊ शकला नाही. व्यवसायात गुंतवणूक झाली आणि लॉकडाउन मुळे परत अर्थार्जनासाठी सुरू असलेला आटापीटा आणि संघर्ष कायम असल्याचे लक्षात आले.

मित्रांनो हे आहेत 'शुभ्रमणी वानखेडे'. इंडस्ट्रियल वार्ड मध्ये राहतात. 2020 च्या सुरुवातीला रोजंदारीने काम करीत, छोटे-मोठे मजूरी करीत यातून जमा झालेली रक्कम गुंतवणूक करून आपला एक सीजनल व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्याने सीजन मधे सोडा, शरबत विक्रीकरिता एक हातठेला बनवून घेतला. यासाठी आपली जमापूंजी कामी लावली. शरबत, सोडा म्हटलं की हे थंड पेय विक्री करण्यास कारखान्यात तयार होणारा बर्फ हवाय. हा बर्फ मार्केटमधून आणल्यास ग्राहकांच्या आरोग्यासाठी बाधा ठरेल म्हणून त्याने एक फ्रिज घेण्याचा निर्णय घेतला. जवळ अधिक पैसे नसल्याने, एक मित्र ललित मुल्लेवार यांच्याकडे एक फ्रिज घेऊन देण्यास आर्थिक मदतीची मागणी केली. तसा शुभ्रमनी हुन्नरी आणि मेहनती व्यक्ति. या व्यवसायात तो चांगला यशस्वी होईल, याची जाणीव असल्याने ललितने मदतीचा हात दिला. मदत मिळाल्याने शुभ्रमनीची अडचण दूर झाली. आता आपला व्यवसाय सुरू होण्याचा मनोमन आनंद होता.

मात्र, मार्च 2020 पासून लॉकडॉउन सुरु झाले. त्यामुळं व्यवसायाची सुरुवात होऊ शकले नाही. लॉकडॉउन पूर्वीच या सीजनल व्यवसायात स्वतःची पूर्ण कमाई या व्यवसायात गुंतवणूक केल्याने हातचा सर्वच पैसा खर्च झाला आणि उधारीसुद्धा झाली. लॉकडाउन मुळे मागील दोन्ही सीजन मधे सोडा-शरबत चा व्यवसाय सुरु होऊ शकला नाही तसेच लॉकडॉउनमुळे इतर कुठलेच काम करता आले नाही. त्यामुळे आणखीनच अडचणीत वाढ झाली. अशातच ज्यांच्याकडून उधारी घेतली, त्यांची परतफेड न करू शकल्याची खंत सुद्धा होती. लॉकडॉउनचा विचार करता त्यास काही कामे दिली तर त्याचा मोबदला न घेता उधारी कापून घ्यावी, असा त्याचा हट्ट असायचा. काम करूनही पण पैसेच नसेल तर घर कसं चालेल होणार, याचा विचार करणारी ही लोकं सुद्धा होते.

अशातच त्याला अवगत असणारी दुसरी कला म्हणजे विद्यार्थ्यांचे स्टडी टेबल तयार करणे. किमान स्टडी टेबल तयार करून विकल्यास फायदा होईल म्हणून परत थोडी मदत घेऊन मागील वर्षी लॉकडॉउन काळात विद्यार्थ्यांकरीता उपयोगाचे स्टडी टेबल विक्रीसाठी तयार करून घेतले. स्वतः उद्योगी असल्याने त्याने साधे लोखंडी पाइप व स्टेनलेस स्टीलचे पाइप वापरून छोटया विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता वापरता येईल असे टेबल तयार केले. मात्र लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या आणि लॉकडाउन मुळे स्टडी टेबलची विक्री होऊ शकली नाही. परत गुंतवणूक आणि परत व्यवसाय सुरुच न होणे, आर्थिक अडचणीत वाढ, जणु काही हा कोरोनाकाळ शुभ्रमनी ची परीक्षाच पाहत असेल.

घरी पत्नी, दोन लहान मुलं. त्यांचा सांभाळ करीत घरगाडा चालविण्यास मोठी अडचण निर्माण झाली. जमेल ते काम हाती येईल ते का घरचे अर्थार्जन व्यवस्थित व्हावे म्हणून रोज कमावणे आणि रोज खाणे असा दैनंदिन कार्यक्रम आखला. कधी मोलमजुरी, कधी पेंटिंग चे काम असा प्रवास सुरु झाला. कधी हाती काम यायचे कधी कोणते काम मिळायचे आणि कधी रिकाम्या हाताने घरी परतायचे. सध्या लॉकडाउन नंतर महिन्यातून जेमतेम दहा-बारा दिवस हाताला काम मिळते. यातून कसाबसा उदरनिर्वाह चालला होता. ज्यांनी उधार दिले त्यांचे कड़े कुठले काम केल्यास त्याचा मोबदला न घेता हा स्वाभिमान मात्र त्याने कायम राखला.

मित्रांनो, मात्र अश्या व्यक्तिना आपण काही सहकार्य करू शकलो तर त्यांच्या संघर्षपूर्ण या लढ़यात यशस्वी होण्यास, त्यातून बाहेर निघण्यास आपण नक्कीच मदत होईल. या व्यक्तीला मदत नाही म्हणनार पण, त्याचे व्यवसायात सहकार्य केल्यास आपण दुहेरी सेवाकार्य, सामाजिक बांधीलकी जोपासू शकता. आपल्या घरी मुलांना स्टडी टेबल घ्यायचे असल्यास शुभ्रमनी कडील तयार असलेले स्टडी टेबल आपल्या घरी मुलांकरिता विकत घेऊन किंवा घरी आवश्यकता नसल्यास आपल्या नजरेतिल, घर परिसरातील गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना हे दीड-दोन हजार किमतीचे स्टडी टेबल विकत घेऊन भेट देऊ शकतो, तर या उपक्रमातून 'शुभ्रमनी' याचा व्यवसाय वाढ़ीला मदत आणि एखाद्या गरजु हुशार विद्यार्थ्यास अश्या दोघांनाही आपली मदतच होईल.

गरीब गरजु हुशार विद्यार्थ्यांना ही महत्वाची भेट वस्तु मिळाल्याने त्यास अभ्यासात हुरूप येईल, आणि प्रोत्साहन मिळेल. यातूनच शुभ्रमनी कडील टेबल विकले गेल्याने त्याच्या बंद पडलेल्या व्यवसायास सुरुवात होईल, आणि नवे टेबल तयार करीत विक्री सुरु झाल्याने घरगाडा सुद्धा सुरळीत होण्यास मदत होईल...

शुभ्रमनी वानखेडे यांच्या उद्योगाला बळ देण्यासाठी आपण पुढे येऊया. त्यांचा मोबाईल क्रमांक 9158039567 (शुभ्रमणी वानखेडे, इंडस्ट्रियल वार्ड) हा असून आपण फोन करून साहित्य मागवू शकता.