स्वतःला गोळी मारून केली जवानाने आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ जुलै २०२१

स्वतःला गोळी मारून केली जवानाने आत्महत्या

नागपूर : विशेष सुरक्षा पथकात (एसपीयू) कार्यरत पोलिस कर्मचारी प्रमोद शंकरराव मेरगुवार (४६) यांनी स्वतःला गोळी मारून केली आत्महत्या केली. शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. ती उघड झाल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
गेल्या पाच वर्षांपासून प्रमोद विशेष सुरक्षा पथकात कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोना झाला. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांचे म्युकरमायकोसिसचे ऑपरेशन झाले. त्यानंतर डोळे आणि डोक्याचा त्यांना त्रास होऊ लागला.


कुटुंबीयांनी त्यांच्यावर हैदराबाद येथेही उपचार केले. मात्र, पाहिजे तसा लाभ झाला नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली. मनोबल नसल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून कमालीचे अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी त्यांनी आपल्या मानकापूरातील घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.