जुन्नर तालुक्यातील खरीप पिकांसाठी १८८ कोटींचे कर्ज वाटप - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, जुलै २१, २०२१

जुन्नर तालुक्यातील खरीप पिकांसाठी १८८ कोटींचे कर्ज वाटप

डिजिटल साक्षरतेसाठी मेळाव्यांचे आयोजन

जुन्नर / आनंद कांबळे
पुणे जिल्हा सहकारी बँकेने चालु खरीप हंगामासाठी
जुन्नर तालुक्यातील २६ हजार ३८० शेतकऱ्यांना १८८ कोटी २ लाख ५६ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. २१ हजार हेक्टर क्षेत्रासाठी हे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यासाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २३३ कोटी ७३ लाख ४२ हजार रुपये इतके आहे. य ३० सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार असल्याची माहीती जिल्हा सहकारी बँकेचे विभागीय आधीकारी बाळासो मुरादे, सुभाष कवडे यांनी दिली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक व डिजिटल साक्षरता वाढावी, या हेतूने जिल्हा बँकेने नाबार्डसोबत जनजागृती मोहीम सुरू केल्याची माहिती विकास अधिकारी संजीव गोसावी यांनी दिली. नाबार्डच्या ४२ व्या वर्धापनदिनाचे औचित्याने तालुक्यात १५ साक्षरता घेण्यात आले . मेळाव्यात बँकिंग क्षेत्रात झालेले बदल, डिजिटल बँकिंग , आरटीजीएस, एनइएफटी, फंड ट्रान्सफर बँकेच्या ठेव योजना, बिगर शेती कर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज, वाहन कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, वारसनोंद आदीं संबधी माहिती देण्यात आली.
जुन अखेर बँकेचे ९६.३३ टक्के कर्ज वसूल झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तीन हजार अधिकच्या शेतकऱ्यांनी कर्जाचा लाभ घेतला आहे.


कोरोनामुळे यंदा कर्ज मागणीत वाढ झाली आहे. पात्र शेतकऱ्यांना यापुढेही ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पिकांसाठी कर्ज वाटप केले जाणार आहे. एकही पात्र शेतकरी खरीप पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना बॅंकेने दिल्या आहेत."
- ॲड. संजयराव काळे, संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक..