अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन शिल्पा शेट्टी च्या पतीस अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१९ जुलै २०२१

अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन शिल्पा शेट्टी च्या पतीस अटकएका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आला होता. एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी अटक केली होती. चित्रपट बनवणाऱ्या अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती. आज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. सुमारे 7 ते 8 तास चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. उद्या त्यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.