HSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२८ जुलै २०२१

HSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी

31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

सुप्रीम कोर्टानं बारावीच्या परीक्षासंदर्भात देशातील सर्व बोर्डाना महत्वाचा आदेश दिला आहे. सर्व राज्यांना बारावीच्या परीक्षाचा निकाल 31 जुलैपुर्वी जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे.कोर्टान हा आदेश 24 जूनला दिला होता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे बोर्डाकडून यापूर्वी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. काही दिवसापूर्वी शिक्षकांनी निकालाचं काम करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती,ती देखील संपली असल्यानं निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. 

 महाराष्ट्र सरकारला कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून बारावी निकाल   फाॅर्म्युला  प्रसिद्ध केला आहे.  महाराष्ट्र सरकारनं बारावीचा निकालासाठी दहावी,अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे.दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.