Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

शुक्रवार, जुलै १६, २०२१

कवठा शिवारात ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटली एक महिला जागीच ठार तर पाच किरकोळ जखमी

कवठा शिवारात ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटली एक महिला जागीच ठार तर पाच किरकोळ जखमी



संजीव बडोले प्रतिनिधी

नवेगावबांध ता.१६. गोठणगाव येथे धानाची रोवणी करण्याकरता महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर क्रंमाक MH35-8105, ट्राली MH35D 8140 उलटल्याने एक महिला ठार तर पाच जखमी झाले आहेत. सदर घटना आज दिनांक १६ जुलै रोज शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता कवठा काळीमाती जंगल रस्त्यावर घडली. प्राप्त माहितीनुसार गोठणगाव येथील वामन चांदेवार याचे शेतात रोवणी करण्याकरता सकाळी नऊ वाजता नवेगावबांध येथील १० महिला व २पुरुष असे १२ पुरुष महिला मजूर ट्रॅक्टर मालक हितेश मन्साराम राऊत(वय ३०वर्षे),चालक महेश वामन चांदेवार वय 35 वर्षे राहणार नवेगावबांध यांच्या आयशर ट्रॅक्टर क्रंमाक MH35-8105, ट्राली MH35D 8140 ट्रालीत बसून जात होती. मौजा कवठा च्या समोर कवठा-काळिमाती या रस्त्याने जंगलातून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला रस्ता देण्याकरता चालकाने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घेतले,पण ट्रॅक्टरचे ब्रेक फेल झाल्याने, चालकाचे संतुलन बिघडल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या कडेला पलटली. यात झालेल्या अपघातात नवेगावबांध येथील सत्यभामा मनीराम कुंभरे( वय५५वर्षे) ही जागीच ठार झाली. तर तिची सून गायत्री अशोक कुंभरे (वय 28 वर्षे) हिचे पायाचे हाड मोडल्यामुळे गंभीर जखमी झाली आहे. तर किरकोळ जखमी मध्ये देवांगणा वामन चांदेवार (वय 40 वर्षे), सरीता मुकेश चाफेकर (वय ४०वर्षे), विमल सितकुरा बडोले (६० वर्षे) पंचफुला युवराज साखरे (65 वर्षे ) सर्व राहणार नवेगावबांध यांचा मध्ये समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ट्रॅक्टरचे ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. अशी माहिती ठाणेदार हेगडकर यांनी दिली आहे. सर्व जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारा साठी दाखल करण्यात आले. अर्जुनी मोरगाव तालुक्याचे तहसिलदार विनोद मेश्राम यांनी ग्रामिण रुग्नालय नवेगांवबांध येथे जख्मीची भेट घेतली. दरम्यान पाच किरकोळ जखमी पैकी तीन जणांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले आहे. तर दोन जखमींवर ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचार सुरु आहे. सदर अपघाताची चौकशी नवेगावबांध पोलिस करीत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.