मृत पावलेल्या परिवाराच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्यात यावी -मनसे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ जुलै २०२१

मृत पावलेल्या परिवाराच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्यात यावी -मनसे


आज नागपूर शहराला प्रथम महिला जिल्हाधिकारी पदावर नुकत्याच लाभलेल्या सौ विमला आर भ्रा.म.से. यांचे मनसे महिला सेना नागपूर तर्फै पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
  . दि.२/१२/२०१६ रोजी मौजा वांजरा येथिल  पिवळी नदी कामठी रोड नागपूर निकिता फार्मस्युटीकल स्पेशालिटी प्रा .लि .नागपूर कारखान्यात १०-०० च्या  सुमारास कारखान्यात FBD या दुसऱ्या माळ्यावर रेडिएटर ब्लास्ट झाल्याने आग लागली .ह्या आगीत तरुण मुले मरण पावली होती .या वेळला कंपनी तर्फै अत्यंत अल्प मदतनिधी दिला गेला होता.माजी मुख्यमंत्री व माजी ऊर्जा मंत्री यांनी मृत पावलेल्या परिवाराच्या नातेवाईक यांना दहा लाख रुपये देऊ असे आश्वासन दिले होते परंतु आतापर्यत कुठल्याही प्रकारची मदतनिधी मिळालेला नाही .अशा  तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत .
        अग्नीताडंवामध्ये १६ तरुण मुले मरण पावली होती .पाच ते सहा वर्षे झाली आतापर्यत  कुठलीही आर्थिक मदत प्रशासन तर्फै देण्यात आलेली नाही .पिडित परिवार अत्यंत हलाखीची परिस्थितीत जीवन जगत आहे .आपण या विषयावर गंभीरपणे लक्ष देऊन पिडित परिवाराला न्याय द्यावा याकरिता शहर अध्यक्ष मनीषा पापडकर यांच्या नैतृत्वात निवेदन सादर  करण्यात आले .  यावेळी जिल्हाधिकारी मैडम यांनी नियमात बसेल तर नक्कीच मदतनिधी मिळवून देते असे आश्वासन दिले .यावेळी  शहर अध्यक्ष सौ मनीषा पापडकर ,अचलाताई मेसन महाराष्ट्र सैनिक,सहसचिव स्वाती जैस्वाल ,मेघना  गिरीपूंजे पिडित परिवारातील सदस्य उपस्थित होते