Top News

डिजिटल मीडियाचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश | digital media

*‘ व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश* *ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश* *मुंब...

ads

गुरुवार, जुलै २९, २०२१

राज्यातील कर्तृत्वान शिक्षकांसाठी 'विदर्भ शिक्षकरत्न कर्तृत्ववान पुरस्कार' |

 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजनविदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) तर्फे राज्यातील शिक्षकांसाठी 'विदर्भ शिक्षकरत्न कर्तृत्ववान पुरस्कार' राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.  


कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असतांना सुध्दा राज्यातील शिक्षक Online आणि Offline पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकवीत आहे. प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात राहण्यासाठी शिक्षक मनापासून प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नांची दखल शासनासह सर्वांनी घ्यावी, त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी आणि त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे याच प्रामाणिक हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


राज्यातील शिक्षकांमधून  सात गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.


राज्यातील शिक्षकांमधून सात गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

1) अंगणवाडी गट 

2) प्राथमिक गट (पहिली ते चौथी)

3) माध्यमिक गट (पाचवी ते दहावी)

4) उच्च माध्यमिक गट (अकरावी ते बारावी)

5) मुख्याध्यापक (गट)

6) शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी (गट)

7) शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे काम करणाऱ्या व्यक्ति (गट)

सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

कोरोना प्रादुर्भाव काळातही शाळा बंद शिक्षण सुरू असतांना शिक्षकांनी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम इतर शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.


उपक्रम अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.

1) उपक्रमाचे शीर्षक 

2) उपक्रमाची गरज व महत्त्व

3) उद्दिष्टे 

4) नियोजन 

5) यशस्वीता /निष्कर्ष 

6) समारोप /फायदे

7) परिशिष्टे

8) उपक्रमाची सद्यस्थिती 

9) पीडीएफला (स्वत:चे नाव व गट) असे नाव द्यावे.   

10) स्वत: शाळेत राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र सोबत पाठवावे. 

या मुद्द्यांचा समावेश असावा. 

शब्दमर्यादा 3000 शब्द असून जास्तीत जास्त 10 फोटोचा वापर करावा. अहवाल 10 एम बी पर्यंत (जास्त नको) पीडीएफ स्वरूपात तयार करून फक्त  9096840741 याच व्हाट्सअप नंबरवर व्हाट्सएपनेच पाठवायचा आहे. (इतर नंबर वर पाठविल्यास विचारात घेतला जाणार नाही)


शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तयार करावा. (हस्तलिखितही चालेल) उपक्रम हा शिक्षकांनी यापूर्वी स्वत: राबविलेला असावा. उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख 25 आॅगस्ट 202 आहे.


या उपक्रमाची तपासणी राज्य पुरस्कार विजेते शिक्षक व शैक्षणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. प्रत्येक गटातील प्रथम दहा उपक्रमशील शिक्षकांना आणि प्रत्येक गटात तीन उत्तेजनार्थ पुरस्कारप्राप्त शिक्षकांना (एकूण 91) ट्रॉफी आणि प्रमाणपत्र  मान्यवर मंत्रीमहोदय व शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. 


या पुरस्कारासाठी नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी शुल्क 500/- रुपये असून दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड केली जाईल. 

दि. 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिनी’ निकाल जाहीर करण्यात येईल व त्यानंतर लगेचच सप्टेंबर महिन्यात भरगच्च कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन राज्यातील कर्तृत्वान शिक्षकांसाठी 'विदर्भ शिक्षकरत्न कर्तृत्ववान पुरस्कार' नियोजन समितीतर्फे  करण्यात येत आहे. 

1) उपक्रम सुवाच्च अक्षरात हाताने लिहिलेला असेल तरी चालेल.

2) एका शिक्षकांस दोन-तीन उपक्रम पाठविता येतील.. कितीही उपक्रम आपण पाठवू शकता.. (प्रत्येकी रजि. फी भरावी लागेल)

3) गट नंबर सात मध्ये पालक किंवा विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकता आणि आपला उपक्रम पाठवू शकता.

4) शब्द किंवा पाने यांची कुठलीही मर्यादा नाही. पीडीएफ 10 mb च्या आत असावी 

5) अंतिम मुदत 25 आॅगस्ट 2021 असून ती पुढे वाढविण्यात येणार नाही.

6) विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संघटक शिक्षक, शिक्षिका देखील यात उपक्रम पाठवून सहभागी होऊ शकता.

7) सकारात्मक विचारसरणी ठेऊन यात सर्वांनी सहभाग नोंदवावा.

8) उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास संपादकीय मंडळाशी (9860214288, 9423640394) संपर्क करावा.

नोंदणी शुल्क रक्कम 500 रुपये PhonePe, Google Pay, द्वारे 7387463371 या नंबर वर जमा करावी. नोंदणी शुल्क जमा केल्याचा स्क्रीनशॉटसह आपले नाव, पत्ता, फोन नंबर इ. तपशील 9096840741 या नंबरला उपक्रम पी डी एफच्या खाली व्हाटसअॅपवर पाठवावा. नोंदणी शुल्क भरले नसल्यास आपला उपक्रम विचारात घेतला जाणार नाही. 

👏👏👏👏👏👏👏👏 

पुरस्कार निवड समिती

'विदर्भ शिक्षकरत्न कर्तृत्ववान पुरस्कार'पेज नेव्हिगेशनSHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.