२६ जुलै २०२१
डॉ. संजय पाचभाई यांच्या 'संजयवाणी' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन
डॉ. संजय पाचभाई यांच्या 'संजयवाणी' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन
Dr. Sanjay Pachbhai's 'Sanjayvani' poems publication
खरे तर.. मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था, नागपूरच्या भव्य समारंभातच डॉ. संजय पाचभाई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा माझा मानस होता. परंतु कोरोना कालावधीत संस्थेचे बरेच कार्यक्रम रद्द करावे लागलेत. आपल्या सारख्या सारस्वतांच्या आशीर्वादासाठी मला नागपूर नगरीत पुन्हा यायला आवडेल. 'मराठीच्या शिलेदारांशी असलेले ऋणानुबंध हे माझं शक्तीस्थळ आहे.' असे प्रतिपादन मुख्य परीक्षक व कार्यकारी संपादिका सविता पाटील ठाकरे, सिलवासा यांनी केले. त्या 'संजयवाणी' कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभास विशेष अतिथी म्हणून बोलत होत्या.
मराठीचे शिलेदार समूहाचे 'काव्यरत्न' डॉ. संजय पाचभाई यांच्या 'संजयवाणी' या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन 'किर्ती हॉटेल,नंदनवन' नागपूर येथे उत्साहात पार पडले. समारंभास अध्यक्षा म्हणून डॉ देवकी बोबडे, प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ कवी, परीक्षक मा. सुधाकरदादा भुरके, स्तंभलेखक डॉ अनिल पावशेकर सर, प्रमुख पाहुणे डॉ.सौ.किशोरी पाचभाई व उद्घाटक म्हणून मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा अध्यक्ष, संस्थापक, संपादक व 'संजयवाणी' काव्यसंग्रहाचे प्रकाशक आ.राहुल पाटील व मितेश पाचभाई, डॉ प्रदीप पाटील व डॉ अजय कुलवाल उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ संजय पाचभाई यांनी आपल्या प्रास्ताविकात बालपणातील आठवणींना उजाळा देत, काव्यरथाचा सारथी कसा झालो याबाबत आचार विचारांचा उलगडा केला. तर कवितेची पहिला वाचक असलेल्या पत्नी डॉ किशोरी पाचभाई यांच्या मार्गदर्शक प्रतिक्रियेमुळेच 'संजयवाणी'ची निर्मिती झाली असे सांगितले. समारभांचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ कवी सुधाकर भुरके यांनी 'काव्यपसारा' कशाप्रकारे आवरत संजयवाणीचा इथवरचा प्रवास आपल्या मनोगतातून मांडला. उद्घाटक राहुल पाटील यांनी 'संजयवाणी' चा जन्म ते प्रकाशन यातील चढउतार विस्तृत स्वरुपात कथन करत, साहित्य क्षेत्रात कोणत्याही अडचणी आल्यास त्या सर्व स्तरावर मदतीने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले. डॉ. पाचभाई यांनी साहित्यसेवाचा वसा निरंतर चालू ठेवावा असे प्रतिपादन डॉ प्रदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. देवकी बोबडे यांनी 'संजयवाणी' कविता संग्रहास शुभेच्छा देत अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्मिती डॉ पाचभाई यांच्या हातून व्हावी असे मत मांडले.
Dr. Sanjay Pachbhai's 'Sanjayvani' poems publication
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
